पर्यावरणपूरक सात्त्विक गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:36 AM2018-09-09T03:36:59+5:302018-09-09T03:37:02+5:30

पर्यावरणपूरकतेची मोहीम जोर धरत असताना त्यात सामाजिक संस्था आणि संघटनांकडून विविध प्रयोग राबवले जात आहेत.

Eco-friendly Sattvic Ganesh idol | पर्यावरणपूरक सात्त्विक गणेशमूर्ती

पर्यावरणपूरक सात्त्विक गणेशमूर्ती

Next

बदलापूर : पर्यावरणपूरकतेची मोहीम जोर धरत असताना त्यात सामाजिक संस्था आणि संघटनांकडून विविध प्रयोग राबवले जात आहेत. अंबरनाथमध्येही शाडूची माती, साधी माती, गायीचे शेण, गोमूत्र, झेंडूच्या बिया आणि गेरूच्या रंगाच्या मूर्ती तयार करण्याचा प्रयोग केला आहे. सध्या १०० मूर्ती तयार करून बाजारात आणल्या आहेत. इतर पर्यावरणपूरक मूर्तींपेक्षा या मूर्ती स्वस्त असल्याने भक्तांचा प्रतिसाद मिळाला आहे.
थर्माकोलबंदीनंतर संपूर्ण गणेशोत्सवच पर्यावरणपूरक झाला आहे. यात पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. अंबरनाथच्या रोटरी क्लब आॅफ अंबरनाथ नॉर्थ आणि औंबाविकास भावसार व्हिजन इंडिया या संस्थेच्या वतीने गणेशमूर्तींमध्ये अनोखा प्रयोग केला आहे. पर्यावरणपूरकपेक्षा पर्यावरणरक्षक गणेशमूर्ती तयार करण्याकडे लक्ष देत वेगळ्या साहित्यातून गणेशमूर्ती साकारल्या आहेत. यात गरजेनुसार शाडूच्या मातीबरोबरच साधी माती, कागद, गायीचे शेण, गोमूत्र, नैसर्र्गिक संप्रेरक, तुळस, झेंडूच्या बियांसह एकूण ११ घटक मिसळले आहेत. तसेच रासायनिक रंग न लावता लाल गेरूने या मूर्ती रंगवल्या आहेत.
या मूर्ती फक्त १२, १६ आणि १७ इंचांच्या आहेत. त्यामुळे धार्मिक नियमांनुसार शुचिर्भूत अशी ही मूर्ती पूजनासाठी योग्य असल्याची माहिती औंबाविकासच्या राजेश भावसार यांनी दिली. पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन करताना काही प्रमाणावर निसर्गाला त्रास देतात. मात्र, या मूर्तींचा संपर्कपाण्याशी आला असता अवघ्या ४० मिनिटांत या मूर्तींचे विघटन होते.
>१०० मूर्तींची विक्री
संप्रेरकांच्या मदतीने मूर्तीचा पाण्याशी संपर्कआल्यास जलचर प्राणी आणि वनस्पतींच्या खाद्यात रूपांतर होते, अशी माहिती भावसार यांनी दिली. ना नफा ना तोटा या तत्त्वावर या मूर्ती घडवल्या असून प्रयोग म्हणून अवघ्या १०० मूर्ती तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Eco-friendly Sattvic Ganesh idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.