भिवंडीत रस्त्यावरील मुलांसाठी शिक्षणाची गाडी सुरू

By नितीन पंडित | Published: March 10, 2023 07:12 PM2023-03-10T19:12:09+5:302023-03-10T19:14:20+5:30

भिवंडी :दि.१०- शासन शिक्षणबाह्य मुलांना शालेय वातावरणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित असतानाही अनेक स्थलांतरीत मजुरांची मुले शाळेपासून दूर असल्याने ...

Education bus started for street children in Bhiwandi | भिवंडीत रस्त्यावरील मुलांसाठी शिक्षणाची गाडी सुरू

भिवंडीत रस्त्यावरील मुलांसाठी शिक्षणाची गाडी सुरू

googlenewsNext

भिवंडी :दि.१०- शासन शिक्षणबाह्य मुलांना शालेय वातावरणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित असतानाही अनेक स्थलांतरीत मजुरांची मुले शाळेपासून दूर असल्याने महिला व बाल कल्याण विभाग व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथक शाळा सुरू करण्यात आली आहे. भिवंडीत शहरातील कामतघर अंजुरफाटा रस्त्यावरील झोपडपट्टीत श्री साई सेवा संस्था अध्यक्षा डॉ स्वाती सिंह यांच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या शिक्षणाची गाडी या शाळेचा शुभारंभ शुक्रवारी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या प्रसंगी जिल्हा महिला विकास व संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी,समाजसेवक विराज पवार,श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वाती सिंह,बिहार झारखंड सेवा समिती मुंब्राचे एम आय खान ,गायत्री परिवारचे उपेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

स्थलांतरीत मजुरांच्या वस्तीतील मुलांचे भविष्य घडवायचे असेल तर त्यांना सर्वप्रथम समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे त्यासाठी शिक्षण गरजेचे असून शासन योजना बनवीत असली तरी त्यासाठी सेवाभावी संस्थांनी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी केले .रस्त्यावरील शाळा बाह्य मुलांची जिल्ह्यात शासना तर्फे शोधमोहीम घेतली.त्यांमध्ये जिल्ह्यात १९७६ तर भिवंडी शहरात सुमारे ४५० मुले आढळून आल्याने महिला व बालविकास विभागाने ही संकल्पना जिल्ह्यात राबविली आहे .मुंब्रा,ठाणे व भिवंडी शहरात बस मध्ये बनविण्यात आलेल्या फिरते पथक या वर्गखोलीत शिक्षण दिले जाणार आहे .भिवंडीत गुरुवार,शुक्रवार,शनिवार या दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत झोपडपट्टीत येऊन विध्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी दिली.भिवंडी येथील या उपक्रमा श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वाती सिंह यांनी पुढाकार घेतला आहे.

 

Web Title: Education bus started for street children in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.