शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी अधिकाऱ्याला व्यासपीठावरच झापले; नेमकं काय घडले?
By नितीन पंडित | Published: November 19, 2022 08:36 PM2022-11-19T20:36:19+5:302022-11-19T20:39:39+5:30
केसरकरांनी भाषण थांबवून अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली.
भिवंडी - राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी भिवंडीतील काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन अभियानाचे उदघाटन केले. शालेय शिक्षण मंत्री केसरकरांचे भाषण सुरु असतानाच व्यासपीठावर आययएस दर्जाचे अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत एकमेकांशी चर्चा करीत होते. त्यामुळे मंत्री केसरकर यांना भाषण करताना व्यत्यय येत असल्याचे पाहून केसरकरांनी भाषण थांबवून अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली.
मंत्र्यांचे भाषण सुरु असतांना आपसात बोलणे चुकीचे आहे, मी एक सिनिअर मंत्री आहे. मी हे खपवून घेणार नाही, यापुढे लक्षात ठेवा, अशी कान उघडली केसरकर यांनी अधिकाऱ्यांची व्यासपीठावरच केली. तर आपल्या कंपनीने स्पॉन्सरशिप केल्यामुळेच हे ई लर्निंग योजना आपल्याला राबवता येते त्याबद्दल एल अँड टी आणि इन्फोसिसचे आभार देखील केसरकर यांनी यावेळी मानले.