भिवंडीच्या वाहतूक कोंडी आणि खाड्यांचा शिक्षण मंत्र्यांनाही झाला त्रास
By नितीन पंडित | Published: November 19, 2022 08:29 PM2022-11-19T20:29:43+5:302022-11-19T20:30:30+5:30
विशेष म्हणजे ठाण्याहून कशेळी ते काल्हेर मार्ग हा अवघ्या चार तर कशेळी ते अंजुरफाटा हा अंतर अवघ्या ९ ते १० किलोमीटरचा आहे.
भिवंडी - राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर भिवंडीतील काल्हेर येथील जि प शाळेत माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमास वेळेवर त्यांना उपस्थिती राहायचे होते.मात्र भिवंडीतील वाहतूक कोंडी आणि खड्याच्या साम्राज्यामुळे ते वेळेवर पोहचू शकले नाही.त्यामुळे या खड्यांचा व वाहतूक कोंडीचा त्रास आज शिक्षण मंत्र्यांनाही झाला. त्यामुळे केसरकरांनी भाषणात भिवंडीतील वाहतूक कोंडीचा आणि खंड्याचा प्रश्न उपस्थित करून यामध्ये लवकर सुधारणा होण्याची गरज असून यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्याना या विषयी बोलणार असल्याचेही सांगितले. आमदार शांताराम मोरे यांनी देखील याकडे लक्ष द्यावे अशी सूचना देखील केसरकरांनी आमदार मोरेंना यावेळी केली.
विशेष म्हणजे ठाण्याहून कशेळी ते काल्हेर मार्ग हा अवघ्या चार तर कशेळी ते अंजुरफाटा हा अंतर अवघ्या ९ ते १० किलोमीटरचा आहे. मात्र गेल्या चार ते पाच वर्षापासून हा मार्गावर मोट्रोचे काम सुरु असल्याने खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सर्वच राजकीय पक्षासह विविध सामाजिक संघटनांनी वाहतूक कोंडी आणि खंड्याविषयी अनेक अंदोलन ,उपोषण धरणे, रस्ता रोको केलेत,मात्र सर्वांजनिक बांधकाम विभागाकडून थातुरमातुर खंड्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी आणि खड्याची समस्या आजही जैसे थे असल्याने आज मंत्री केसरकरांना याचा फटका बसल्याने मुखमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर वाहतूक कोंडीची अशी समस्या आहे.तर स्थानिक अधिकाऱ्यानेही या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज असून आपण स्वतः मुख्यमंत्री शिंदेंकडे या विषयी बोलणार असल्याचे केसरकारांनी सांगितले.दरम्यान काल्हेर गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन स्वतः ही शाळा उभारून शिक्षणाचं महत्व पटल्याने मी गावकऱ्यांचे अभिनंदन करतो असे बोलून मंत्री केसरकर यांनी काल्हेर ग्रामस्थांचे कैतुक देखील केले.