हंडाभर पाण्यासाठी सुरू आहे ग्रामस्थांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:14 AM2019-06-05T00:14:14+5:302019-06-05T00:14:22+5:30

आदिवासी महिला त्रस्त : सांडपाण्यामुळे बोअरवेलचे पाणी दूषित

Efforts are going on for the villagers | हंडाभर पाण्यासाठी सुरू आहे ग्रामस्थांची वणवण

हंडाभर पाण्यासाठी सुरू आहे ग्रामस्थांची वणवण

Next

वसंत पानसरे 

किन्हवली : तापमानात वाढ झाल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईने सध्या उग्र रूप धारण केले आहे. याबाबत कृती अराखडा बनवूनही उपाय योजना होत नसल्याने अनेक गाव, पाडे पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. आसनगावपासून हाकेच्या अंतरावर असलेले प्लॉटपाडा या आदिवासी वस्तीत पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी येथील आदिवासींची वणवण होत आहे. परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही.

वेहळोवी (बु) ग्रामपंचायत हद्दीत प्लॉटपाडा ही आदिवासी वाडी समाविष्ट आहे. शंभराच्यावर येथे घरे आहेत. अनेक वर्षापासून या वाडीत पाण्याबाबत ठोस उपाययोजना न झाल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. या पाड्यात एक विहीर असून ती कोरडी ठाक पडली आहे. सरकारने दोन विंधन विहीरी येथे दिलेल्या आहेत. परंतु त्यातील एक विंधन विहीर कायमची बंद पडली असून एका विंधन विहिरीतून तीन ते चार दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. पण तो ही कमी प्रमाणात होत असल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना कसरत करावी लागत आहे.

या ठिकाणी एक बोअरवेल आहे, पण या बोअरवेल शेजारीच एका खाजगी हॉटेलचे सांडपाणी साचून राहिल्यामुळे या बोअरवेलचे पाणी दूषित झाले आहे. गेली अनेकवर्ष याबाबत तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे या दूषित पाण्यावरच हे अदिवासी आपली तहान भागवत आहेत.

गेली अनेकवर्ष आमच्या वाडीत पाणीटंचाई असते. परंतु उन्हाळ््यात जास्त पाणीटंचाई निर्माण होत असून वाडीत असलेल्या बोअरवेलचे पाणी खाजगी हॉटेलच्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - प्रशांत गडगे, सामाजिक कार्यकर्ते

पाणीपुरवठा विभागाकडून त्या भागात कर्मचारी पाठवून माहिती घेऊन आवश्यक असल्यास त्या भागात तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी टँंकरची व्यवस्था करतो. ग्रामस्थांशी बोलून अधिक काय उपाययोजना करता येईल त्याबाबत चर्चा करु . - एम.आव्हाड, उपाभियंता

Web Title: Efforts are going on for the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.