पर्यटनाच्या माध्यमातून जव्हारच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 08:37 PM2017-09-01T20:37:17+5:302017-09-01T20:37:36+5:30

पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवून जव्हार शहराचा विकास करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच रस्त्यांचे भक्कम जाळे उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली.

Efforts to build roads through tourism for the development of Jawhar - Eknath Shinde | पर्यटनाच्या माध्यमातून जव्हारच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे

पर्यटनाच्या माध्यमातून जव्हारच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे

googlenewsNext

ठाणे/पालघर, दि. 01 - पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवून जव्हार शहराचा विकास करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच रस्त्यांचे भक्कम जाळे उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. जव्हार नगर परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त ते बोलत होते. चांगले रस्ते जव्हार शहराच्या पर्यटनाला चालना देऊ शकतील त्यामुळे जव्हारच्या भवती चांगल्या रस्त्यांचं जाळं विणण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला आदिवासी विकासमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार चिंतामण वनगा, आमदार पांडुरंग बरोरा, निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते.  पालघर-जव्हार-सिन्नर या राष्ट्रीय महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून डहाणू-जव्हार-मोखाडा-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्याचा कॅबिनेट मंत्री या नात्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही एकनाथ  शिंदे यांनी यावेळी दिली. सध्या प्रस्तावित असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला हे राष्ट्रीय महामार्ग जोडल्यास जव्हारच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी जव्हारवासीयांना दिले. रस्त्याचे भक्कम जाळे या ठिकाणी उभारल्यास देश विदेशातील पर्यटकांना जव्हारला पोहोचणं अधिक सोयीचं होईल आणि जागतिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

जव्हारची पाणीपुरवठा योजना जुनी झाली असून वाढत्या लोकसंख्येबरोबर ही योजना अपग्रेड करण्याची गरज आहे. यासाठी जव्हारजवळील खडखड प्रकल्पातून अतिरिक्त पाणी योजनेला मंजुरी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, विकासासाठी आग्रही असलेले विष्णू सावरा यांच्यासारखे मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचे आणि विशेष करून जव्हारच्या विकासाचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील, असा विश्वासही यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title: Efforts to build roads through tourism for the development of Jawhar - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.