कोरोनामुळे न्यायालयांच्या कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत- अभय ओक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 10:14 PM2021-10-11T22:14:10+5:302021-10-11T22:15:01+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याबद्दल न्या. ओक यांचा ठाणे जिल्हा वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.

Efforts should be made to ensure that the corona does not affect the functioning of the courts - Justice Abhay Oak | कोरोनामुळे न्यायालयांच्या कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत- अभय ओक

कोरोनामुळे न्यायालयांच्या कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत- अभय ओक

Next

ठाणे: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊ नये, अशी मनोकामना आहे. ती आलीच तर न्यायालयाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होणार नाही, याची दक्षता घेऊन सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी सोमवारी येथे केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याबद्दल न्या. ओक यांचा ठाणे जिल्हा वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रधान तसेच जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल पानसरे, जिल्हा न्यायाधीश ब्रम्हे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणो जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम, महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष अॅड. गजानन चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी न्यायमूर्ती ओक यांनी ठाणे जिल्हा न्यायालयापासून सुरू केलेली वकिली ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या प्रवासातील आठवणींचा खास उल्लेख केला. १९८३ मध्ये वकिली सुरु सुरू करताना घरातून आजोबा, वडील यांच्याकडून मिळालेल्या वकिलीचा वारसा आणि कायद्याच्या ज्ञानाचा कित्ता गिरवल्याचे त्यांनी सांगितले. केवळ सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या ठिकाणीच नाही तर तालुक्याच्या ठिकाणी देखील लीगल टॅलेंट आढळून येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

न्यायमूर्ती ओक यांनी यावेळी वडील श्रीनिवास ओक, न्यायमूर्ती विजय टिपणीस, प्रभाकर पाटील या तिन्ही गुरूंचे स्मरण करीत आपले अनुभव कथन केले. जिल्हा न्यायालयातील वकील ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या न्या. ओक यांच्या प्रवासाचा तरु ण वकिलांनी जरुर अभ्यास करावा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन न्या. पानसरे यांनी केले.

न्यायमूर्ती ओक यांच्या रूपाने ठाणो जिल्ह्याला सव्वाशे वर्षांनी हा बहुमान मिळाल्याचे चव्हाण, कदम यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. यावेळी न्यायमूर्ती ओक यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन न्यायमूर्ती ओक यांचे स्वागत केले. कार्यक्रमास न्यायिक अधिकारी, ज्येष्ठ वकील आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Efforts should be made to ensure that the corona does not affect the functioning of the courts - Justice Abhay Oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.