धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 04:26 PM2018-06-04T16:26:44+5:302018-06-04T16:26:44+5:30
धनगर प्रतिष्ठान या संस्थेने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ठाणे : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत चर्चा करणार असून धनगर समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ या संघटनांच्या वतीने ठाण्यात गडकरी रंगायतन येथे आयोजित "धनगर रत्न" पुरस्कार सोहळ्यात केले धनगर समाज कित्येक वर्षांपासून धनगर आरक्षण लागू करावे म्हणून प्रयत्न करत आहे,यासाठी समाजाने अनेक आंदोलने केली आहेत परंतु धनगर आरक्षणाचा प्रश्न मात्र अद्याप सुटू शकलेला नाही यासाठी आपण पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कडे याबाबत चर्चा करून आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करून समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी उपस्थित समाज बांधवाना दिले,ठाण्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून समाजाच्या मागणी लक्षात घेता समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी समाजभवन उपलब्ध करून देण्यासाठी मी समाजासोबत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले,धनगर प्रतिष्ठान या संस्थेने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार देऊन समाजातील रत्नाची माहिती समाजाला करून देऊन सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याने संस्थेचे एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना "धनगर रत्न" पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये नाशिक- मालेगाव महापालिका आयुक्त संगीता धायगुडे ( साहित्य),मध्यप्रदेश तांत्रिक विभाग इलेक्ट्रिसिटी बोर्ड संचालक डॉ मुरहरी केळे ( शासकीय) शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर (राजकीय),पोलीस उपनिरीक्षक दिलीप गढरी, (क्रीडा),शिवराम पाबळे (उद्योजक),माणगंगा प्रतिष्ठान,ठाणे ( सामाजिक संस्था),ठाणे जिल्हा बँकेचे माजी संचालक बाबासाहेब दगडे ( शैक्षणिक),सरपंच शंकर खेमणार ( सामाजिक),पिवळं वादळ मासिक संपादक विजय तमनर ( पत्रकारिता),आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला महात्मा फुले जन आरोग्य योजना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे,नाशिक- मालेगाव महापालिका आयुक्त संगीता धायगुडे, शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर,यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे,धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे,उपवनसंरक्षक दादासाहेब शेंडगे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे,धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे,समाजसेविका भारती चौगुले, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर,डॉ अरुण गावडे,ज्ञानेश्वर परदेशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .यावेळी महिलांना खास लकी ड्रॉ द्वारे 5 पैठण्या तसेच पुरुषांसाठी खास आकर्षक बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव संदेश कवितके, खजिनदार कुमार पळसे,उपाध्यक्ष संतोष बुधे,प्रचारप्रमुख अविनाश लबडे,उपसचिव अमोल होळकर,उपखजिनदार तुषार धायगुडे,सल्लागार सुनील राहिंज,सूर्यकांत रायकर,दिलीप कवितके,मनोहर वीरकर,कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,राजेश वीरकर,सुरेश भांड,अरुण परदेशी ,दीपक झाडे,सचिन बुधे,मंगेश गुंड,ऋषी पिसे,महेश पळसे,प्रशांत कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्ष माधवी बारगीर,उपाध्यक्ष सुजाता बुधे, सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,उपसचिव अश्विनी पळसे,उपखजिनदार संगीत खटावकर,सल्लागार अर्चना वारे,सदस्य सुचिता कुचेकर,सुषमा बुधे,सीमा कुरकुंडे,स्नेहा खटावकर,रतन वीरकर,सुजाता भांड आदीनी परिश्रम घेतले.