आठ तासांच्या प्रवासामुळे प्रवासी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 12:57 AM2020-08-20T00:57:28+5:302020-08-20T00:57:34+5:30

उर्वरित कर्मचा-यांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ते करत आहेत.

The eight-hour journey annoyed the passengers | आठ तासांच्या प्रवासामुळे प्रवासी वैतागले

आठ तासांच्या प्रवासामुळे प्रवासी वैतागले

Next

कुमार बडदे 
मुंब्रा : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या मुंब्रा येथील नागरिकांना प्रवासाकरिता आठ तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे. या प्रवासामुळे त्यांच्या शारीरिक क्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याने ते कमालीचे त्रस्त झाले आहेत. रेल्वेने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची सुविधा दिली आहे. उर्वरित कर्मचा-यांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ते करत आहेत.
सध्या सुरू असलेल्या अनलॉकच्या प्रक्रियेत फक्त अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्यांनाच प्रवास करण्याची सवलत दिली आहे. यामुळे मुंबईतील विविध भागांमधील दुकाने तसेच इतर खाजगी क्षेत्रात काम करत असलेल्या मुंब्रा-कौसा परिसरातील हजारो कर्मचारी तसेच व्यावसायिक यांना रेतीबंदर येथील चौकातून सुटणाºया बेस्टच्या बसने प्रवास करावा लागत आहे. बेस्टची मार्ग क्रमांक ४९४ ही बस मुंबईतील घाटकोपर बसडेपो पर्यंत धावते. या बसची संख्या प्रवाशांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे सकाळी बससाठी अर्धा ते एक किलोमीटर रांग लागते. बस सुटण्याच्या ठिकाणी निवाºयाची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना भर पावसात दीड ते दोन तास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. यामध्ये महिला, वृद्ध आणि मुलांची आबाळ होते. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे.
>बससाठी दोनदा रांग लावण्याची येते वेळ
बेस्ट बसने विक्रोळी तसेच घाटकोपरपर्यंत प्रवास केल्यानंतर इच्छितस्थळी जाण्यासाठी पुन्हा दुसºया बसने प्रवास करावा लागतो. त्यासाठी पुन्हा दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागते. परतीच्या प्रवासातही हाच द्राविडी प्राणायाम करावा लागतो. यामुळे प्रवासासाठी दररोज आठ तास खर्च करावे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासात वेळ खर्च होत असल्याने त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर होत असल्याची तक्रार मोहम्मद साजिद आणि मोहम्मद अब्बासी या प्रवाशांनी ‘लोकमत’कडे केली.

Web Title: The eight-hour journey annoyed the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.