बेकायदा मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या आठ तोतया डॉक्टरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:27 AM2020-02-08T03:27:55+5:302020-02-08T03:28:17+5:30

कळव्यामध्ये काही तोतया डॉक्टर असून ते लोकांच्या जीवाला धोका निर्माण करून ते त्यांच्यावर उपचार करतात, अशी माहिती कळव्यातील एका दक्ष नागरिकाने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला २०१९ मध्ये अर्जाद्वारे दिली होती.

Eight imprisoned doctors issued illegal death certificates | बेकायदा मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या आठ तोतया डॉक्टरांना अटक

बेकायदा मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या आठ तोतया डॉक्टरांना अटक

Next

ठाणे : कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र किंवा अधिकार नसतानाही मृत्यूचे प्रमाणपत्र देणाऱ्या तसेच रुग्णांच्या जीवाशी खेळून त्यांच्यावर उपचार करणाºया अलोक सिंह (३९) याच्यासह आठ तोतया डॉक्टरांनाठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने गुरुवारी अटक केली.

कळव्यामध्ये काही तोतया डॉक्टर असून ते लोकांच्या जीवाला धोका निर्माण करून ते त्यांच्यावर उपचार करतात, अशी माहिती कळव्यातील एका दक्ष नागरिकाने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला २०१९ मध्ये अर्जाद्वारे दिली होती. याच अर्जाची मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने सखोल चौकशी केली. यामध्ये तथ्य आढळल्यानंतर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबईचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, प्रबंधक दिलीप वांगे, सदस्य डॉ. बाळासाहेब हरपळे यांच्या मदतीने संबंधित बोगस डॉक्टरांच्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते.

त्यानुसार, पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त एन.टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कळवा विभागामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाºया बनावट डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये धाड टाकली. या कारवाईमध्ये रामजित गौतम (४७), गोपाल बिश्वास (४७), रामतेज प्रसाद (५०), सुभाषचंद यादव (४७), जयप्रकाश विश्वकर्मा (४०), दीपक विश्वास (४८) आणि सत्यनारायण बिंद (४२) यांना गुरुवारी अटक केली.

Web Title: Eight imprisoned doctors issued illegal death certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.