ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू , ४७१ रुग्ण नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 03:41 AM2021-02-20T03:41:06+5:302021-02-20T03:41:30+5:30
CoronaVirus News in Thane : ठाणे शहरात १४४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६० हजार ७४५ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ३७८ झाली.
ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ४७१ रुग्ण आढळल्याने आता दोन लाख ५९ हजार ६६८ रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २२७ झाली आहे.
ठाणे शहरात १४४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६० हजार ७४५ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ३७८ झाली. कल्याण- डोंबिवलीत १४५ रुग्णांची वाढ झाली असून, तीन मृत्यू आहेत. आता ६१ हजार ६८९ रुग्ण बाधित असून, एक हजार १८६ मृत्यूंची नोंंद आहे.
उल्हासनगरमध्ये नऊ रुग्ण सापडले असून, एकाचा मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७२९, तर ३७० मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला तीन बाधित आढळून आले असून, एकही मृत्यू नाही. आता बाधित सहा हजार ७५० असून, मृतांची संख्या ३५४ कायम आहे. मीरा- भाईंदरमध्ये १८ रुग्ण आढळले असून, एक मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या २६ हजार ६६५ असून, मृतांची संख्या ८०२ झाली आहे.
अंबरनाथमध्ये १० रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. येथे बाधित आठ हजार ६८१ असून, मृत्यू ३१४ कायम आहेत. बदलापूरमध्ये १२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित नऊ हजार ६२५ झाले आहेत. या शहरातही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या
१२५ कायम आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून, एकही मृत्यू नाही, तर बाधित १९ हजार ३९६ झाले असून, आतापर्यंत ५९२ मृत्यू नोंदले आहेत.
वसई -विरारमध्ये १७ नवे काेराेना रुग्ण
वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शुक्रवारी दिवसभरात १७ रुग्ण नव्याने आढळले असून शुक्रवारी रुग्णालयातून १२ रुग्ण मुक्त झाले. तर दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आता शहरांत अजूनही २१० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मागील आठवड्यात कोरोना आटोक्यात होते. मात्र, आता पुन्हा रुग्ण वाढत आसल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची तसेच महापालिका प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलणे आवश्यक झाले आहे.