अबब! ढिगाऱ्याच्या संरक्षणासाठी आठ लाख खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:23 PM2020-02-22T23:23:31+5:302020-02-22T23:23:51+5:30
भिवंडी पालिकेचा भोंगळ कारभार; ८ महिन्यांपूर्वी कारवाई
भिवंडी : शहारातील बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्यानंतर ढिगारा वेळेवर उचलला जात नाही. ढिगाºयाची व्हिलेवाट न लावल्याने पालिकेला त्या ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक तैनात करावे लागतात. या सुरक्षारक्षकांवर प्रशासनाने आठ लाखांची उधळण केल्याचा आरोप स्थायी समितीचे सभापती हलीम अन्सारी यांनी केला आहे.
शांतीनगर परिसरातील पिरानी पाडा येथे तळ अधिक पाच माजली बेकायदा इमारत बांधली होती. त्या विरोधात मुंबई उच्च नायायालयात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने इमारत जमीनदोस्त करण्यासाठी शहा एंटरप्रायझेस या कंत्राटदाराला कंत्राट दिले होते. कंत्राटाची रक्कम दहा लाखाच्या घरात असल्याचे समजते. ही इमारत २७ जून २०१९ रोजी संपूर्ण इमारत पाडण्यात आली. इमारत पाडल्यानंतर हा ढिगारा उचलण्यासाठी प्रशासनाला आठ महिने उलटूनही मुहूर्त मिळालेला नाही.
ढिगाºयात सळई व लोखंड असल्याने जूनपासून ढिगाºयाच्या रक्षणासाठी सुरक्षारक्षकांचा पाहरा ठेवण्यात आला आहे. उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी पालिकेच्या सुरक्षारक्षकांवर या ढिगाºयाच्या संरक्षणाची जबाबदारी दिली असून दिवसरात्र एकूण सहा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची सेवा पालिका कार्यालयासाठी असताना त्यांना इतरत्र सुरक्षारक्षक म्हणून नेमणे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्य सुरक्षा अधिकारी सुभाष चव्हाण यांनी ही बाब आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यावर सहा पैकी चार सुरक्षारक्षक त्या ठिकाणाहून कमी केले. सध्या दोन सुरक्षारक्षक या ढिगाºयाचे संरक्षण करत आहेत. त्यांच्या वेतनावर आठ लाख खर्च केला आहे.
भोंगळ कारभार
बेकायदा बांधकामांवर वेळीच कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. परंतु अशा प्रकारे ढिगाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जेवढ्या किमतीचा मुद्देमाल ढिगाºयाखाली गाडला गेला नाही त्याहून अधिक रक्कम प्रशासनाने सुरक्षेसाठी खर्च केली आहे. अधिकाºयांच्या भोंगळ कारभारामुळे पालिकेवर विनाकारण आर्थिक बोजा होत असल्याची टीका स्थायी समितीचे सभापती हलीम अन्सारी यांनी केली आहे.