कळव्यातील नागरिकांसाठी आठ तात्पुरत्या चिकित्सालयांची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 08:56 PM2020-03-29T20:56:44+5:302020-03-29T21:01:15+5:30
कोरोनाच्या भीतीमुळे कळवा परिसरातील काही दवाखानेही बंद झाले आहेत. नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून काही सेवाभावी डॉक्टरांच्या मदतीने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा शहरात आठ ठिकाणी तात्पूरत्या स्वरुपामध्ये ‘कम्युनिटी डिस्पेन्सरी’ ही संकल्पना राबविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या संकटामुळे कळवा आणि मुंब्रा भागातील काही दवाखाने बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कळव्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आठ तात्पूरते चिकित्सालय सुरु करीत असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री तसेच कळवा मुंब्रा येथील स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
कोरोनाच्या संकटामुळे अनेक दवाखाने बंद झालेले आहेत. तसेच जे चालू आहेत, तेही अगदी अल्प वेळ चालविले जातात. त्यामुळे इतर रुग्णांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. ही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या सुविधेसाठी काही डॉक्टरांच्या मदतीने तात्पूरत्या चिकित्सालयांचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ही केंद्र सुरु राहणार आहेत.
मुंब्य्रातील डॉक्टरांनी एकत्र येऊन एका रु ग्णालयाचे रूपांतर तपासणी केंद्रामध्ये केले आहे. शहरातील ताप सर्दी खोकला किंवा कोरोना संबंधित लक्षण आढळल्यास या रुग्णालयात अशा रुग्णांची वेगळी तपासणी केली जाणार आहे. हे केंद्र शिवाजी नगर मुंब्रा येथे सुरु केले आहे. त्याप्रमाणेच कळवा भागातील आठ ठिकाणी अशी केंद्र सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.
अशी आहेत चिकित्सालये:
१ कावेरी सेतू सेंटर: डॉ. सचिन म्हात्रे, डॉ. उत्तम थोरात, डॉ. प्रिती दवे आणि सुनंद खरात
२. न्यू कळवा स्कूल सेंटर: डॉ. राजू पमनानी, डॉ. शैलेश चांदणे, डॉ. रुपेश दळवी आणि डॉ. सुनयना करे आदींचे पथक आहे.
३. पारसिक नगर: डॉ. संजय पाटील, डॉ. अमृता रसाळ, डॉ. अजित दळवी, डॉ. पूनम निहाटकर आणि डॉ. प्राची पंडीत आदी.
४. खारेगाव: डॉ. राज पाठक , डॉ. संदेश केणे, डॉ. चेतन भानुशाली, डॉ. वैभव राणे, डॉ. शैलेश शुक्ला आणि डॉ. माधवी खेडेकर आदी
५. शांतीनगर (कळवा रेल्वे स्टेशन): डॉ. शैलेश गगे, डॉ. कोष्टी, डॉ. अरुणा वर्मा आणि डॉ. रेषा जाधव.
६. विटावा सेंटर: डॉ. सुधीर गायकवाड, डॉ. पडवळ, डॉ. मानवडकर, डॉ. संतोष ठाकरे, डॉ. विनोद पाटील, डॉ. कमलेश पाटील, डॉ. गणेश जगताप आणि डॉ. योगेश कोळी.
७. भास्कर नगर:डॉ. सुभाष बडे, डॉ.सुनिल गुप्ता, दिनेश यादव आणि डॉ. संकेत पाटील तर आठव्या घोलाईनगर केंद्रातून डॉ. प्रशांत सकपाळ, डॉ. राहूल पाटील, डॉ. प्रविण ढेंढे, डॉ. अभिनंदन मिश्रा, डॉ. हेमलता चौधरी आणि विनोद मौर्य या सहा डॉक्टरांचे पथक राहणार आहे. अशा आठ ठिकाणी हे केंद्र नागरिकांना सेवा देणार आहेत.