मे अखेर कोपरी पुलावरून धावणार आठपदरी वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 12:09 AM2019-12-26T00:09:45+5:302019-12-26T00:10:08+5:30
एकनाथ शिंदे यांची माहिती : जकातनाक्यांच्या जागेवर अतिरिक्त मार्गिका
ठाणे : नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोपरी पुलाच्या पायलिंगचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या स्लिप गर्डरचे काम पालघर येथे सुरू आहे. फेब्रुवारी महिनाअखेर पायलिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील अडीच महिन्यांत गर्डरचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर अस्तित्वातल्या जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंना नव्याने उभारल्या जाणाºया या पुलांवरून वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. त्यानंतर, जुना पूल पाडून त्या ठिकाणी मे २०२० अखेरपर्यंत नव्या पुलाची उभारणी करून आठपदरी वाहतूक सुरू होईल, अशी माहिती मंगळवारी राज्याचे नगरविकास तथा गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिगृहात आयोजित बैठकीत दिली.
कोपरी पुलाच्या रु ंदीकरणाच्या कामामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याच्या प्रवेशद्वारापाशीच मोठी वाहतूककोंडी होते. त्याची गंभीर दखल घेऊन शिंदे यांनी मंगळवारी संबंधित विभागांची ही बैठक बोलावली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंते विनय सुर्वे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे आदी अधिकारी तिला उपस्थित होते.
मनुष्यबळ वाढविण्याची सूचना
रेल्वे आणि एमएमआरडीएच्या अधिकाºयांना आदेश दिले. त्यासाठी मनुष्यबळ आणि कामाचा वेग वाढवून रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करण्यास बजावले आहे. या कामामुळे होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची रु ंदी वाढवा. मुंबई महापालिकेच्या बंद जकातनाक्याच्या जागेतून पर्यायी मार्गिका सुरू करून शक्य असेल, तिथे मुख्य रस्त्यावरील दुभाजक हटवून रस्त्याची रु ंदी वाढवा, अशा उपाययोजनाही त्यांनी यावेळी सुचविल्या आहेत.
मुंबई महापालिका देणार जकातनाक्यांची जागा
पुलाचे काम करताना वाहतूक पोलिसांकडून आवश्यक परवानग्यांबाबत सहकार्य मिळाले, तर कामाचा वेग वाढवता येईल, असे मत रेल्वे आणि एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी यावेळी मांडले. त्यानंतर, शिंदे यांनी ठाण्याचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) अमित काळे यांना फोन करून आवश्यक असलेल्या परवानग्या तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या बंद जकातनाक्याची काही जागा मिळाली, तर तिथून पर्यायी मार्गिका सुरू करणे शक्य आहे. शिंदे यांनी त्याबाबतच्या सूचना दिल्यानंतर ही जागा तातडीने उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रवीण दराडे यांनी स्पष्ट केले. या कामाच्या साप्ताहिक अहवाल सादर करण्याच्याही सूचना रेल्वे आणि एमएमआरडीएला केल्या.
नव्या ठाणे स्थानकासाठी सर्वंकष आराखडा
भविष्यात या ठिकाणी नवे रेल्वेस्टेशन उभारले जाणार आहे. त्यामुळे तीनहातनाक्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढेल. ती सुरळीत पद्धतीने व्हावी, यासाठी ग्रेड सेपरेटर, भुयारीमार्ग व पर्यायी रस्त्यांचे जाळे निर्माण करणे क्र मप्राप्त आहे. त्याची रूपरेषा ठरविण्यासाठी आणि संभाव्य अडथळ्यांवर कशी मात करता येईल, यासाठी एमएमआरडीएसह मुंबई आणि ठाणे महापालिका अधिकाºयांनी संयुक्त बैठका घेऊन सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानुसार, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बैठकांना सुरुवात होणार आहे.