येऊरच्या निसर्ग परिचय केंद्रात चिऊताईची आठ फुटी प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 08:16 PM2019-03-19T20:16:11+5:302019-03-19T20:20:40+5:30
सिमेंट कॉक्रि ंटच्या जंगलात चिमण्यांना राहायला जागा नाही. त्यांना घरटी बांधता येत नाही, त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. उन्हाळ्यातही चिमण्यांना खूप त्रास होतो. याची जाणीव करून देण्यासाठी आणि चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा संकल्प करून सुमारे एक हजार घरटे येथील संकल्प इंगिलश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी लावले.
ठाणे : जागतिक चिमणी दिन २० मार्च रोजी आहे. याची मोठ्याप्रमाणात जनजागृती करून चिऊताईच्या अस्थित्वाची गरज, तिचा संभाळ करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आदीं उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांनी या येऊरच्या निसर्ग परिचय केंद म्हणजे फुलपाखरू उद्यानात आज आठ फुटाच्या चिऊ ताईची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी उभारून चिऊताई वाचवण्याचा संदेश दिला.
सिमेंट कॉक्रिटच्या जंगलात चिमण्यांना राहायला जागा नाही. त्यांना घरटी बांधता येत नाही, त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. उन्हाळ्यातही चिमण्यांना खूप त्रास होतो. याची जाणीव करून देण्यासाठी आणि चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा संकल्प करून सुमारे एक हजार घरटे येथील संकल्प इंगिलश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी लावले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, महाराष्टÑ वनविभाग आणि संकल्पइंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम व उपक्रम मानपाडा येथे पार पडला.
विद्यार्थ्यांनी आठ फुटाच्या चिमणीची प्रतिकृती तयार करून या उद्यानाच्या प्रवेशव्दाराव लावून चिऊ ताईच्या अस्थित्वाच्या गरजेची जाणीव करून दिली आहे. सध्या पर्यावरणाचा ºहास होत आहे. याबरोबर एक वेळ अशी येईल की चिमणीची ही प्रजाती नष्ट होईल. यास वेळीच पायबंद घालण्यासाठी मागील दोन वर्षांपासून चिमणी बचाव मोहिमेची सुरूवात येथील संकल्प इंगिलश स्कूलच्या उद्यार्थ्यांकडून करण्यात आली. यंदाही या विद्यार्थ्यांसह शाळेच्या शिक्षकांनी तुटलेल्या बेंचेस व अन्य मोडकळीस साहित्याव्दारे चिमणीची मोठी प्रतिकृती तयार करून लावली आहे. चिमणी वाचवा निसर्ग वाचवा, चिमणीवर प्रेम करा, चिमणी वाचवा निसर्गाचा बचाव करा आदी संदेशही विद्यार्थ्यांनी पोस्टरव्दारे यावेळी दिले.
विद्यार्थी भावी पिढीचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यांना निसर्ग जोपासण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाची आवड या विद्यार्थीवयात जोपासली तर पर्यावरणप्रेमी पिढी तयार करण्यासह प्रत्येक नागरिकांनी उन्हाळ्यात दाणापाणी व आडोशाला घरटी उभारून चिमणी वाचवण्याच्या चळवळीस बळ देण्याचा सूर या वेळी पार पडलेल्या कार्यक्रमात ऐकायला मिळाला. यावेळी मानपाडा परिसरात विद्यार्थ्यांनी रॅली काढून चिमणी बचाव संदेश दिला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागीय वनअधिकारी आर.बी. कुंभार, येऊरचे आरएफओ राजेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना पारितोषक देऊन प्रोत्साहित केले , संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती परब, डॉ. राज परब आदींसह अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी, पोएटरी मॅरेथॉनचे हेमंत नेहते आदींसह विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.