एकलव्य गौरव पुरस्काराचे आज होणार वितरण; दिलीप प्रभावळकर यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:13 AM2020-09-06T00:13:46+5:302020-09-06T00:13:51+5:30
बिकट परिस्थितीत शैक्षणिक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव
ठाणे : समता विचार प्रसारक संस्था आयोजित २८ वा वार्षिक एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्र म उद्या रविवारी, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा. संस्थेच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पहाता येईल. झूम मिटींगच्या स्वरु पात होणाºया या कार्यक्रमात, ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ सहभागी होणार असून अध्यक्षस्थानी संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर आहेत, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष मनिषा जोशी यांनी दिली.
समाजात विविध प्रश्नांवर सातत्याने काम करणारी आणि ठाणे शहरातील परीघरेषेवर असणाºया दुर्बल घटकांविषयी कळवळा असणारी व कार्य करणारी समता विचार प्रसारक संस्था आहे. एकलव्य गौरव पुरस्कार ही संस्थेची दुसरी ओळख आहे. १९९२ पासून गोरगरीब वस्तीतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संस्था काम करीत आहे. परिस्थितीशी झगडत शालान्त परीक्षा उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचा ‘एकलव्य गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो.
शाळेच्या वेळे व्यतिरिक्त घराला हातभार लावणारी ही १४-१५ वयोगटांतील मुले जेव्हा स्पर्धात्मक परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करायला निघतात, तेव्हा गुणवत्ता यादीत ९०-९५ टक्के मार्क मिळवणाºया विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागेच पडतात. क्लासला जाणे परवडत नाही. शिक्षण साहित्य अपुरे. घरात अभ्यासाला जागा नाही. शैक्षणिक वातावरण नाही. अशा परिस्थितीत या मुलांनी मिळवलेले ३५-४० टक्के गुण देखील ९० टक्क्यांच्या तोलामोलाचे असतात, असे जोशी म्हणाल्या.
संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून ‘एकलव्य सक्षमीकरण योजना’ सुरु केली. ही योजना ठाणे महापालिकेच्या उथळसर, मानपाडा, कळवा आणि सावरकर नगर या माध्यमिक शाळांच्या मदतीने आखण्यात आली. घराच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितील मुलांसाठी गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी या विषयांकरिता शनिवार-रविवारी जादा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली. व्यक्तिमत्व विकासासाठी आय. पी. एच. या संस्थेच्या मदतीने अभ्यासपूरक व्याख्याने, क्र ीडास्पर्धा, तसेच येऊर येथे संस्कार शिबिरे आयोजित केली गेली. त्यामुळे मुलांच्या मनावरील ताणतणाव कमी झाला.
मुलांच्या शिक्षणाकरिता आई, आजीचा पुढाकार
औद्योगिकीकरणाच्या रेट्यात किंवा कोरोना महामारीच्या संकटात आई-वडिलांना नोकरीधंदा नाही, रोजंदारीवर काम करणारे पालक, कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहेत. या समस्यांचा सामना करता येत नाही म्हणून व्यसनाधीन झालेली कुटुंबे पाहायला मिळतात. एकट्या बाईवर घर चालवण्याची वेळ येते. आपल्या वाट्याला जे आले ते मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून झटणाºया आई, आजी यांच्या कथा ऐकून मन हेलावल्याशिवाय राहत नाही.
‘वंचितांचा रंगमंच’मुळे लाभले व्यासपीठ
गेली सहा वर्षे कै. रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘वंचितांचा रंगमंच’ या उपक्र मात ही मुले सहभागी होत आहेत. नाट्यजल्लोष कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या उत्कटतेने मांडत आहेत. व्यसनाधीन पालक, आईची ओढाताण, मुला-मुलींवर होणारा अन्याय नाटिकांतून सादर करीत आहेत. यामुळे या वंचित मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय.