Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे ७ विश्वासू शिलेदार ठेवताहेत आमदारांवर वॉच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:26 AM2022-06-23T09:26:15+5:302022-06-23T09:26:59+5:30

Eknath Shinde: मुंबई, ठाणे, सुरत ते गुवाहाटी असा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा प्रवास सुरू असून या प्रवासात आमदारांवर वॉच ठेवण्यासाठी ठाण्यातील सात माजी नगरसेवकांची फौज तैनात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Eknath Shinde: 7 loyal stoners of Eknath Shinde are keeping watch on MLAs | Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे ७ विश्वासू शिलेदार ठेवताहेत आमदारांवर वॉच

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे ७ विश्वासू शिलेदार ठेवताहेत आमदारांवर वॉच

googlenewsNext

ठाणे  : मुंबई, ठाणे, सुरत ते गुवाहाटी असा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा प्रवास सुरू असून या प्रवासात आमदारांवर वॉच ठेवण्यासाठी ठाण्यातील सात माजी नगरसेवकांची फौज तैनात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या बाजूला जमा होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला आहे. शिंदेंकडे गेलेले काही आमदार परत शिवसेनेत यावेत याकरिता सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर यांच्यासह अनेक नेते प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे सुरत येथून पळून आले. आपल्याला बळजबरी इंजेक्शन दिल्याचा आरोप त्यांनी केला. आमदारांनी आपल्या तंबूतून पळ काढू नये यासाठी शिंदे यांची टीम कामाला लागली आहे. शिंदे यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, संजय मोरे, कणसे आदींसह सात माजी नगरसेवक सध्या आमदारांना सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांकरिता सुरुवातीला मुंबईहून ठाण्यातील उपवन येथील महापौर निवासस्थानी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी महत्त्वाची चर्चा झाल्यानंतर हे सर्व आमदार पुढे सुरतच्या दिशेने रवाना झाले. यापूर्वी महापालिकेत सत्तेची समीकरणे जुळविण्यासाठी हेच नगरसेवक शिंदे यांच्यासोबत उभे राहात होते व शिंदे यांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला होता.  

Web Title: Eknath Shinde: 7 loyal stoners of Eknath Shinde are keeping watch on MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.