एकनाथ शिंदे यांना व्हर्च्युअल सोहळ्यात राज्यपालांकडून पदवी प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:15+5:302021-03-05T04:40:15+5:30

ठाणे : मंत्रिपदाच्या व्यापातून वेळ काढत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादन करण्याचे स्वप्न ...

Eknath Shinde conferred degree by the Governor in a virtual ceremony | एकनाथ शिंदे यांना व्हर्च्युअल सोहळ्यात राज्यपालांकडून पदवी प्रदान

एकनाथ शिंदे यांना व्हर्च्युअल सोहळ्यात राज्यपालांकडून पदवी प्रदान

Next

ठाणे : मंत्रिपदाच्या व्यापातून वेळ काढत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादन करण्याचे स्वप्न पूर्ण केलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हर्च्युअल सोहळ्यात नुकतीच पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा व्हर्च्युअल पदवीदान सोहळा झाला.

परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, तरी शिंदे यांच्या मनात शिक्षणाची जिद्द आणि तळमळ कायम होती. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात नाव नोंदवले आणि सलग तीन वर्षे चिकाटीने अभ्यास करून गेल्या वर्षी ते बीए परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. मराठी आणि राजकारण (प्रत्येकी तीन पेपर) असे दोन विषय घेऊन शिंदे अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसले होते. ७७.२५ टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले होते.

या परीक्षेचा पदवीदान समारंभही कोरोनामुळे व्हर्च्युअल पद्धतीनेच झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन आणि कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. शिंदे यांच्यासह गोंदिया येथील शैलेश चुटे, मुंबईतील सईद रुखसार फातेमा सईद अहमद, निकेश कुऱ्हाडे या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गौरवण्यात आले. या सोहळ्यात २०१९ व २० या दोन वर्षांत विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदविका, पदव्युत्तर पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल, पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

Web Title: Eknath Shinde conferred degree by the Governor in a virtual ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.