एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) अंतिम फेरीत 

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 8, 2024 05:34 PM2024-05-08T17:34:46+5:302024-05-08T17:35:36+5:30

अन्य लढतीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने बॉईज क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत अंतिम फेरीतले स्थान निश्चित केले. 

Eknath Shinde Cricket Club (B) in the final | एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) अंतिम फेरीत 

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) अंतिम फेरीत 

ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये प्रकाश झोतात खेळल्या गेलेल्या लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने ठाणे वॉरियर्स क्रिकेट क्लबचा सहा गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर टी २० क्रिकेट लीग स्पर्धेतील सलग चौथे विजेतेपद मिळवण्याकडे वाटचाल केली. अन्य लढतीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने बॉईज क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत अंतिम फेरीतले स्थान निश्चित केले. 

उपांत्य फेरीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने ठाणे वॉरियर्स क्रिकेट क्लबला १६.४ षटकात१०५ धावांवर गुंडाळले.रमणप्रीत सिंग (२६) आणि जितेश राऊतने ३३ धावा केल्यामुळे ठाणे वॉरियर्स क्रिकेट क्लबला शतकी धावसंख्या उभारता आली. प्रतिस्पर्ध्यांना मर्यादित धावांवर रोखताना धृमील मटकरने आठ धावांत ३, हेमंत बुचडे आणि अर्जुन शेट्टीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. उत्तरादाखल अमन खान,निखिल देसाई आणि आशय सरदेसाईने जबाबदारीपूर्ण खेळी करत ८.५ षटकात ४ बाद १०९ धावसंख्येसह एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला निर्णायक फेरीत पोहचवले. या डावात खिजार दाफेदारने दोन, अजित यादव आणि यासिन शेखने प्रत्येकी एक बळी मिळवला.

अन्य लढतीत बॉईज क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ बाद १६० धावांचे आव्हान उभे केले. त्यात आदित्य रावत (६९) आणि हर्षल जाधवने (५४) अर्धशतकी धावसंख्येचे योगदान दिले. प्रथमेश महाले, परीक्षित वळसंगकर,भाविन दर्जीने प्रत्येकी दोन बळी मिळवले. या आव्हानाला सामोरे जाताना प्रसाद पवारने नाबाद ५४ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. श्रीराज घरतने नाबाद ३९ आणि अनिल रोंनकीने ४९ धावा करत संघाला विजयी केले. हर्षल जाधव, निनाद ठाकूर आणि यश सिंगने प्रत्येकी एक गडी बाद केला.

Web Title: Eknath Shinde Cricket Club (B) in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.