५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना ५० कोटीच्या निधी वाटपातून चोख उत्तर - एकनाथ शिंदे

By अजित मांडके | Published: April 14, 2023 05:55 PM2023-04-14T17:55:57+5:302023-04-14T18:40:39+5:30

ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयत्ती निमित्ताने शिंदे यांनी ठाण्यात हजेरी लावली होती.

Eknath Shinde - Eknath Shinde gives 50 crore fund allocation to those accusing 50 boxes | ५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना ५० कोटीच्या निधी वाटपातून चोख उत्तर - एकनाथ शिंदे

५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना ५० कोटीच्या निधी वाटपातून चोख उत्तर - एकनाथ शिंदे

googlenewsNext

ठाणे : जे ५० खोके करतात पण आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० कोटींपेक्षा अधिकचे वाटप म्हणजेच मदत केली असून हे आम्ही आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान सहन केला जाणार नाही. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात, जनताच आता त्यांना त्यांची जागा दाखवेल अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयत्ती निमित्ताने शिंदे यांनी ठाण्यात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरातील पुतळ्याला देखील त्यांनी अभिवादन केले. यानंतर आनंद आश्रम येथे शेतकरी लॉंग मार्च दरम्यान निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुबियांना ५ लाखांची आर्थिक मदत केली. यावेळी पत्रकरांशी बोलतांना त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

दरम्यान शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार असून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुबियांना कोणत्याही प्रकारे वाºयावर सोडले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत होऊ घातलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्मारक हे जागतिक दर्जाचे असेल, जगाला हेवा वाटेल असे ते असणार असून परदेशातील लोक हे स्मारक बघायला येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  आमदार बोरणारे बाबत पोलीस तपास करीत आहेत. तसेच गृहखाते देखील यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील दोन ते अडीच वर्षात केवळ दोन ते अडीच कोटींचेच वाटप झाले. मात्र मागील आठ महिन्यात आम्ही आरोग्य सेवेतून ५० कोटीहून अधिकचे वाटप केले आहे. त्यामुळे ५० खोक्यांचा आरोप करणाºयांना हे चोख उत्तर असल्याचेही त्यांनी सांगितले.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान महाराष्टÑ राज्य किंवा देश सहन करणार नाही, सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध यात्रा व सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी सावरकर गौरव यात्रा काढलेली आहे. परंतु सावरकरांचा अपमान हा देश कदापी सहन करणार नाही असा इशाराच त्यांनी राहुल गांधी यांना दिला. सावरकरांचा अपमान करणाऱ्यां त्यांची जागा दाखविल्याशिवाय महाराष्टातील जनता गप्प बसणार नाही. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात, त्यांना त्यांची जागा जनता दाखवून देईल असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट हे लोकशाहीचे राज्य आहे, त्यामुळे आमच्या विरुध्द बोलणारे, सावरकरांच्या विरोधात बोलणारे जेलमध्ये गेले असते असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यपालांच्या बदली बाबत त्यांना विचारले असता सकाळीच ते आपल्याला भेटले आहेत.

त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना बाबत आरोग्य विभागाने बैठक घेतली आहे, टास्कफोर्स काम करीत आहे. कोरोनाचा धोका नसला तरी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Eknath Shinde - Eknath Shinde gives 50 crore fund allocation to those accusing 50 boxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.