Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:51 PM2024-11-23T12:51:20+5:302024-11-23T12:58:12+5:30
Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result Live Updates: एकनाथ शिंदे यांना दहा फेऱ्यांच्या मतमोजणी नंतर तब्बल ४५ हजार मतांची आघाडी
Kopri-Pachpakhadi Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यापासून धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या विचारांनी सरकार चालवण्यास सुरुवात केली. वेळोवेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण ठेवत आपणच त्यांचे खरे वारसदार असल्याचे ठणकावून सांगितले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडीतूनएकनाथ शिंदे निवडणुकीत उभे राहिल्यानंतर शिवसेना-ठाकरे गटाने आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे ( Kedar Dighe ) यांना तिकीट दिले. आनंद दिघे यांचा खरा वारसदार कोण हे ही निवडणूकच ठरवेल अशाही ठाण्यात रंगल्या. या चर्चांना आज निकालाच्या निमित्ताने पूर्णविराम लागला आणि आनंद दिघेंच्या ठाण्यात एकनाथ शिंदेंनी मोठ्या फरकाने आघाडी घेतली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा होत्या. त्यात विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघाच्या निकालाकडे लक्ष लागून होते. या मतदार संघात एकनाथ शिंदे यांनी तुफान आघाडी घेत आपणच आनंद दिघे यांचे खरे वारसदार असल्याचे दाखवून दिले. आज मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. पोस्टल मतमोजणीत पहिल्या कलांमध्ये महायुती आघाडीवर दिसली. ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी मतदारसंघात पहिल्या कलांमध्ये एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतली आहेत. ती आघाडी कायम ठेवली. १० फेऱ्यांनंतर एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४५ हजार मतांची आघाडी घेतली. त्यांना ६२,११२ मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावरील यांना १६,१३३ मते मिळाली.
दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखली जात होती. त्यामुळे ठाकरे गटाने कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून तिनदा निवडून आले असून ते यंदाही याच मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे येथे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विजयी होणार हे आता जवळपास निश्चित आहे.