Eknath Shinde: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:19 PM2022-07-05T15:19:16+5:302022-07-05T15:19:59+5:30

Eknath Shinde: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ दीप या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.

Eknath Shinde: Members of Shri Vitthal Rukmini Temple Committee met Chief Minister Eknath Shinde | Eknath Shinde: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Eknath Shinde: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Next

मुंबई - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ दीप या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या पूजेसाठी नक्की उपस्थित राहू आणि पंढरपूर मंदिर समितीला लागेल ती मदत करू असे यासमयी बोलताना स्पष्ट केले. 

याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी श्री.गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.

Web Title: Eknath Shinde: Members of Shri Vitthal Rukmini Temple Committee met Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.