"कधी कोणाला पायचीत करायचे, हे आपल्याला ठाऊक" एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

By अजित मांडके | Published: February 8, 2024 04:30 PM2024-02-08T16:30:32+5:302024-02-08T16:31:52+5:30

गुरुवारी कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलाचे लोकपर्ण शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी ही टीका केली.

Eknath Shinde's indirect criticism of Uddhav Thackeray: "We know when to trample someone." | "कधी कोणाला पायचीत करायचे, हे आपल्याला ठाऊक" एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

"कधी कोणाला पायचीत करायचे, हे आपल्याला ठाऊक" एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

ठाणे : कुठला डाव कधी टाकायचा, कधी कोणाला पायचीत करायचे हे आपल्याला ठाऊक आहे, दीड वर्षा पूर्वी आपण असाच एक कार्यक्रम केला असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. त्यामुळे राज्यातील नकारात्मक शक्ती दूर सारून राज्य सकारात्मक दृष्टिने वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

गुरुवारी कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलाचे लोकपर्ण शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी ही टीका केली. तालुका क्रिडा संकुलाचे काम मागील काही वर्षे रखडले होते. मात्र आज हा प्रकल्प पूर्ण झाला असल्याचा आनंद आहे.  या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेलो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

या ठिकाणी आता  बेडमेंटन देखील सुरू होणार आहे, जिल्ह्यातील खेळाडू मध्ये जिद्द चिकाटी आहे, त्यामुळे येथील  सोयी सुविधा या त्यांच्या फायद्याच्या ठरणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यात आता नवीन फिटनेस पीडी तयार होत आहे, राज्य शासन देखील खेळाडू साठी नवनवीन सुविधा देत आहे, त्यांच्यासाठी वाढीव निधीची तरतूदही करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. तसेच खेळातील बक्षीस रकमेतही वाढ करण्यात आली आहे. आपण पालकमंत्री असल्यापासून मी खेळासाठी काम काम करत आहोत, येत्या काळात जिल्हयातुन नवीन खेळाडू तयार होतील, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. 

दादोजी कोंडदेव स्टेडियमची पांढरा हत्ती ही ओळख आता पुसली गेली आहे, याठिकाणी आता रणजीचे सामने देखील होत आहेत. ठाणे जिल्ह्याला खेळाचा जुना इतिहास आहे आम्ही पूर्वी एकत्र व्यायामाला जात होतो, मात्र आता काळ बदलला आहे, पूर्वी खेळात निवडक संधी होत्या आता अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळं निश्चित ही चांगली बाब असल्याचेही ते म्हणाले.
 

Web Title: Eknath Shinde's indirect criticism of Uddhav Thackeray: "We know when to trample someone."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.