कोरोनाच्या काळात प्रशासनाचे एकदिलाने काम- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 01:03 AM2020-08-16T01:03:48+5:302020-08-16T01:03:57+5:30

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्या संयमाची आणि जिद्दीची परीक्षा पाहणारा आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, असेही ते म्हणाले.

Eknath Shinde's one-sided work of administration during the Corona period | कोरोनाच्या काळात प्रशासनाचे एकदिलाने काम- एकनाथ शिंदे

कोरोनाच्या काळात प्रशासनाचे एकदिलाने काम- एकनाथ शिंदे

Next

ठाणे : कोरोनाच्या या संकटात आपण सर्वजण एकदिलाने एकत्र काम करीत आहोत. पुढील काळात प्रत्येकाने सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, ही चतु:सूत्री दैनंदिन जीवनात अंगीकारली, तर आपण कोरोनावर मात करू शकतो, असा विश्वास नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्या संयमाची आणि जिद्दीची परीक्षा पाहणारा आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, असेही ते म्हणाले.
भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन समारंभ शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. त्या प्रसंगी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, ठाणे मनपा आयुक्त बिपिन शर्मा, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती.
शिंदे म्हणाले की, आपण कोरोनाशी सगळे बळ, सर्व साधनसामग्री एकवटून लढतोय आणि मुख्य म्हणजे त्यात यशस्वी होतोय. मुंबई, ठाणे तसेच
एमएमआर शहरांमधील गेल्या काही दिवसांमधली रुग्णांची आकडेवारी दिलासादायक आहे.
नव्या रु ग्णसंख्येचा आलेख सातत्याने खाली येतोय. त्याचवेळी रु ग्ण बरे होण्याचा दर, रु ग्णसंख्या दुपटीचा कालावधी सातत्याने वाढतोय. मृत्युदर कमी करण्यात आपण यश मिळवतोय. जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महापालिका प्रशासन यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ग्लोबल हॉस्पिटल, त्यापाठोपाठ नवी मुंबईत वाशी येथे सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये सिडकोच्या माध्यमातून एक हजार २०० बेड्सचे रु ग्णालय उभे राहिले. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, मीरा रोड, भार्इंदर, भिवंडी अशा सर्वच शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागांत कुठे २००, तर कुठे ७०० बेड्स अशा क्षमतेची रु ग्णालये उभारण्यात आली, असे त्यांनी
नमूद केले.
सर्व जातीधर्मांच्या बांधवांनी यंदा अतिशय साधेपणाने सण, उत्सव साजरे करून शासनाला सहकार्य केले. आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच अन्य सण शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरे करावेत, असे आवाहन शिंदे यांनी केले.
ध्वजारोहणानंतर शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, कोरोनायोद्धे, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.
>आपत्ती प्रतिसाद निधीतून ८६ कोटी मिळाले!
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी यंदा जिल्हा वार्षिक निधीतून आतापर्यंत २२ कोटी रु पये जिल्हा सामान्य
रु ग्णालय तसेच महापालिकांना देण्यात आले आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ८६ कोटी रु पये जिल्ह्यास उपलब्ध झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.सर्व आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी निधीतून सुमारे साडेसात कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला कोरोनासाठी उपलब्ध करून दिले. या निधीतून आरोग्य सुविधा बळकट करण्यात येत आहे. एक कोटी ९६ लाख गरजंूना अन्नपाकीटवाटप करण्यासाठी हजारो हात पुढे आले. परराज्यांतील मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्याचे शिवधनुष्य जिल्हा व पोलीस प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पेलले. ठाणे जिल्ह्यातून विविध राज्यांसाठी ८० रेल्वेगाड्या रवाना झाल्या. तसेच जिल्ह्यातून पाच हजार ७०० बसगाड्यांद्वारे श्रमिकांना त्यांच्या गावी सोडण्यात आले.

Web Title: Eknath Shinde's one-sided work of administration during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.