एकनाथ शिंदेंचा ठाणे शहर स्वच्छ सर्वेक्षणात तेराव्या क्रमांकावर  

By अजित मांडके | Published: October 1, 2022 08:53 PM2022-10-01T20:53:00+5:302022-10-01T20:53:25+5:30

इंडियन स्वच्छता लीग' मध्ये ठाणे शहराचा देशात पहिला क्रमांक

Eknath Shinde's Thane city ranked thirteenth in clean survey | एकनाथ शिंदेंचा ठाणे शहर स्वच्छ सर्वेक्षणात तेराव्या क्रमांकावर  

एकनाथ शिंदेंचा ठाणे शहर स्वच्छ सर्वेक्षणात तेराव्या क्रमांकावर  

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : इंडियन स्वच्छता लीग" कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ अमृत महोत्सव ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शहराच्या विविध ठिकाणी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा महोत्सव यशस्वी केला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ठाणे शहराचा क्रमांक राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळाला आहे. भारत सरकारच्या वतीने सन २०२२ मध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात तेरावा क्रमांक तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीचा क्रमांक राखण्यात शहराला यश आले आहे.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्यावतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. सन २०२२ रोजी कच-याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृध्दी आदी निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये सन २०२० ला  ठाणे शहराने ५७ व्या क्रमांकावरून देशात १४ व्या क्रमांकावर आघाडी घेतली होती. तर सन २०२१ ला हाच क्रमांक राखण्यात यश आले होते. दरम्यान, राज्यात स्वच्छ  सर्वेक्षणात ठाणे शहराने तिसरा क्रमांक पटकवला आहे.  

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार "इंडियन स्वच्छता लीग" कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ अमृत महोत्सव ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शहराच्या विविध ठिकाणी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा महोत्सव यशस्वी केला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ठाणे शहराचा क्रमांक राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळाला असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने सांगितले.

Web Title: Eknath Shinde's Thane city ranked thirteenth in clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे