एटीएम कार्ड बदलून वृद्धेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:09+5:302021-08-20T04:46:09+5:30

मुंब्रा : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून तिच्या खात्यामधील रक्कम काढून त्यांची फसवणूक ...

Elderly fraud by changing ATM card | एटीएम कार्ड बदलून वृद्धेची फसवणूक

एटीएम कार्ड बदलून वृद्धेची फसवणूक

Next

मुंब्रा : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून तिच्या खात्यामधील रक्कम काढून त्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात मंगळवारी रात्री मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनीत राहत असलेल्या ६४ वर्षांच्या वृद्धा ४ जुलैला परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे त्यांनी पैसे काढण्यासाठी मदत मागितली. याचा गैरफायदा घेऊन त्याने त्याचे कार्ड घेऊन त्यांना दुसरे कार्ड दिले आणि तीन दिवसांदरम्यान त्यांच्या कार्डाचा वापर करून ६४ हजार ३४४ रुपये एटीएममधून काढले. याबाबतची तक्रार त्यांनी १७ ऑगस्टला दाखल केली असून दाखल तक्रारीवरून फसवणूक केलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Elderly fraud by changing ATM card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.