भाईंदरच्या शासकीय रुग्णालयातुन वृद्ध रुग्ण बेपत्ता

By धीरज परब | Published: July 3, 2023 07:50 PM2023-07-03T19:50:55+5:302023-07-03T19:51:13+5:30

रुग्णाला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते. 

Elderly patient missing from government hospital in Bhayander | भाईंदरच्या शासकीय रुग्णालयातुन वृद्ध रुग्ण बेपत्ता

भाईंदरच्या शासकीय रुग्णालयातुन वृद्ध रुग्ण बेपत्ता

googlenewsNext

मीरारोड - भाईंदरच्या शासकीय पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातून ८१ वर्षीय रुग्ण बेपत्ता झाल्याने संताप व्यक्त होत आहे . रुग्णांची सुरक्षा यामुळे वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे . 

मूळचे कोलकत्ता येथील असलेले बद्रीनाथ नाग ( ८१ )  हे मीरारोडच्या सृष्टी भागात काकुली मित्रा ह्या मुलीकडे रहात आहेत . त्यांना  श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रविवारी रात्री भाईंदरच्या भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात त्यांच्या मुलीने दाखल केले होते . नाग यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते . 

सोमवारी सकाळी साडे सहा वाजता मुलगी घरी आली व दुपारी १२ वाजता पुन्हा रुग्णालयात गेली . रुग्णालयात जाऊन पाहिले तर तिचे वडील बद्रीनाथ हे दिसले नाहीत . तिने सर्वत्र शोधाशोध सुरु केली . रुग्णालयातील कोणीहि बद्रीनाथ बाबत माहिती देत नव्हते . त्यामुळे ती रडत वडिलां बाबत विचारत होती. 

रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी याना ३ महिन्याचे वेतन मिळाले नाही म्हणून मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत सह १४६ विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सचिन पोपळे , उपाध्यक्ष वैशाली येरुणकर, अभिनंदन चव्हाण , रॉबर्ट डिसोझा ,  चंद्रशेखर जाधव , श्रेयस सावंत , गणेश बामणे आदी रुग्णालयासाजे शल्यचिकित्सक डॉ . जाफर तडवी यांना निवेदन देण्यासाठी आले होते . त्यावेळी बद्रीनाथ यांच्या मुलीने मनसे पदाधिकाऱ्यांना घडला प्रकार सांगतीला. 

मनसैनिकांनी या बाबत रुग्णालय प्रशासनास धारेवर धरल्या नंतर चौकशी सुरु झाली . बद्रीनाथ यांना सकाळी सध्या वॉर्ड मध्ये आणण्यात आले होते.  सव्वा बाराच्या दरम्यान बद्रीनाथ हे रुग्णालयातून निघून गेल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसले . या प्रकरणी भाईंदर पोलीस वृद्ध बद्रीनाथ यांचा शोध घेत आहेत. सायंकाळ पर्यंत ते सापडले नसल्याने चिंता व्यक्त होत आहे . 

रुग्णालयातील रुग्णांच्या देखभाल व सुरक्षेची जबाबदारी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची असताना देखील त्यांचा कमालीचा हलगर्जीपणा या मुळे उघडकीस आला आहे .आयसीयू मधून रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये हलवताना त्याचे नातेवाईकांच्या उपस्थितीत हलवले पाहिजे होते . मनसेने या बाबत डॉ . तडवी सह हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे, असे हेमंत सावंत म्हणाले . 

Web Title: Elderly patient missing from government hospital in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.