ठाण्यात एसटी बसच्या धडकेत पादचारी वृद्ध महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:47 PM2020-10-15T23:47:45+5:302020-10-15T23:49:39+5:30
खोपट येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये शिरणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत ८० वर्षीय पार्वती गोपीनाथ खरात ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी चालक बबन दिलीप भामरे यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: खोपट येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये शिरणाºया एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत ८० वर्षीय पार्वती गोपीनाथ खरात ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यात तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून चालक बबन दिलीप भामरे यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील वर्तकनगर, भीमनगर येथे राहणारी ही कचरावेचक वृद्ध महिला खोपट बस स्थानकासमोरुन गुरुवारी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास जात होती. त्याचवेळी शहापूर ते ठाणे या मार्गावरील एसटी बसने तिला धडक दिली. दोन्ही पायांवरून बसचे चाक गेल्याने दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊनही तशाच अवस्थेत ही महिला त्याठिकाणी बराच वेळ विव्हळत बसली होती. नंतर राबोडी पोलिसांच्या मदतीने तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
* लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा अजूनही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी मर्यादीत सुरु आहे. त्यामुळे खोपट रेल्वे स्थानकातून कल्याण, शहापूर तसेच मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. जवळच सीएनजी भरण्यासाठी रिक्षांचीही मोठी रांग असते. त्यामुळेच याठिकाणी नेहमी अपघात होत असतात. एक आठवडयापूर्वीही अशाच अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या भागात वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.