महापौरपदाची निवडणूक : नाराज नगरसेवकांवर वॉच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 02:42 AM2018-09-09T02:42:42+5:302018-09-09T02:42:54+5:30

Election of Mayor: Election Commissioners | महापौरपदाची निवडणूक : नाराज नगरसेवकांवर वॉच

महापौरपदाची निवडणूक : नाराज नगरसेवकांवर वॉच

Next

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून दगाफटका होऊ नये म्हणून साई, भाजपातील नाराज व बंडखोर नगरसेवकांवर भाजपाकडून वॉच ठेवण्यात येत आहे. भाजपाचाच महापौर होणार असल्याची प्रतिक्रीया प्रकाश माखिजा यांनी दिली आहे.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ओमी कलानी टीमच्या दबावापुढे लोटांगण घेत मीना आयलानी यांना महापौरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. महापौरपदाची निवडणूक सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवडयात जाहीर होणार आहे. निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून साई व भाजपातील नाराज व बंडखोर नगरसेवकांच्या प्रत्येक हालचालींवर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांकडून वॉच ठेवण्यात येत आहे. तशी कबुली भाजपाच्याा स्थानिक नेत्याने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर दिली. महापौरपदाची निवडणूक जाहीर होताच दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना गुप्त ठिकाणी नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभा व विधानसभा निवडणुका पुढीलवर्षी होत असल्याने शिवसेनेलाही महापौरपद हवे आहे. त्यादृष्टीकोनातून शिवसेनेने गुप्त हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेचे एकूण २५ नगरसेवक असून राष्ट्रवादीचे -चार, रिपाइं- दोन, काँॅगे्रस, भारिप व पीआरपी पक्षाचे प्रत्येकी एक असे एकूण ९ नगरसेवक सोबत असल्याचा शिवसेनेने दावा केला आहे.
तसेच साई व भाजपातील नाराज नगरसेवकांवर शिवसेनेनेही लक्ष केंद्रीत केले. मात्र शिवसेनेचे महापौरपदाचे स्वप्न भंग करण्यासाठी भाजपानेही कंबर कसली आहे. शिवसेने सोबतच्या भारिप, रिपाइं व पीआरपीच्या नगरसेवकांना भाजपाकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
>प्रकाश माखिजांकडे दिली सूत्रे
भाजपातील निष्ठांवत गटाचे नेतृत्व करणारे प्रकाश माखिजा यांच्याकडे महापौरपदाच्या निवडणुकीची जबाबदारी वरिष्ठांनी सोपविली आहे. त्यांचे सर्वच पक्षांसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याने इतर लहान पक्षाच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी होतील असे बोलले जात आहे. महापौरपद ओमी टीमकडे गेले असली तरी पंचम कलानी भाजपाच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्या अधिकृतपणे भाजपाच्या असल्याचे माखिजा यांनी सांगितले.

Web Title: Election of Mayor: Election Commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.