इलेक्शन आठवणी : गेले ते दिन गेले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:33 AM2019-03-18T04:33:06+5:302019-03-18T04:33:16+5:30

देशात निवडणूक सुधारणा लागू करून टी.एन. शेषन यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी निवडणुकीतील कल्पकता मात्र संपुष्टात आणली. एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ घाटकोपरपासून पुढे दूरवर पसरला होता.

 Election memorabilia: gone from day to day ... | इलेक्शन आठवणी : गेले ते दिन गेले...

इलेक्शन आठवणी : गेले ते दिन गेले...

googlenewsNext

देशात निवडणूक सुधारणा लागू करून टी.एन. शेषन यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी निवडणुकीतील कल्पकता मात्र संपुष्टात आणली. एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ घाटकोपरपासून पुढे दूरवर पसरला होता. या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे स.गो. बर्वे हे दोनवेळा विजयी झाले. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे मुकुंदराव आगासकर हे त्यावेळच्या जनसंघाचे उमेदवार तिसऱ्यांदा जेव्हा रिंगणात उतरले, तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर एक घोषणा रंगवली होती. ‘मुकुंदा, मुकुंदा पडणार कितींदा एकदा, दोनदा की तीनदा?’ बर्वे विजयी झाल्यावर काँग्रेसची मंडळी कल्याणमधून त्यांची शोभायात्रा काढायचे कारण हा परिसर जनसंघाचा बालेकिल्ला मानला जायचा. याच मतदारसंघातून शिवसेनेने लष्करातील पहिले भारतीय जनरल करिअप्पा यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना स्थापन झाली तेव्हा त्यांनी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’चा नारा दिला असताना कानडी करिअप्पांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने जनसंघाच्या मंडळींना सेनेला डिवचण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे भिंतीवर घोषणा रंगली की, ‘मराठी माणसाच्या मारता गप्पा, आता कशाला हवा करिअप्पा’. याच करिअप्पा यांच्या मिरवणुकीत एक गडबड झाली होती. त्यामुळे ठाण्याचे तत्कालीन डीसीपी लोणे यांनी लाठीमार करून गडबड करणाऱ्यांना चोप दिला होता. तेव्हा कल्याणमध्ये चर्चा झाली होती की, लोणेसाहेब, मारायचे तर काठीला लोणी लावून तरी झोडायचे. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत तत्कालीन जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रंगवलेली घोषणा अशीच कल्पक व चिरकाळ स्मरणात राहील, अशी होती. वा रे इंदिरा तेरा खेल, सस्ता बेवडा, महंगा तेल... त्यावेळी खाद्यतेल महाग होती आणि दिवाळीत तेल गायब होत असे. ते टंचाईचे दिवस आता उरले नाहीत. भिंती रंगवून निवडणुका लढणे राहिले नाही आणि अशा कल्पकतेचे कार्यकर्तेही उरले नाहीत.

Web Title:  Election memorabilia: gone from day to day ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.