सभापती निवडणूक ८ फेब्रुवारीला
By admin | Published: January 28, 2017 02:38 AM2017-01-28T02:38:07+5:302017-01-28T02:38:07+5:30
महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक ८ फेब्रुवारीला होणार आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी त्यासाठी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर
कल्याण : महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक ८ फेब्रुवारीला होणार आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी त्यासाठी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची पिठासीन अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. परंतु, समिती पूर्णपणे स्थापन न झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत मनसेने या निवडणुकीला हरकत घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
महिला-बालकल्याणच्या ११ सदस्यांमध्ये शिवसेना गटाचे ५, भाजपाचे ४ तर काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी १ सदस्य आहे. समितीतील सदस्यांचा कालावधी २९ डिसेंबरला संपला. नवीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी २६ डिसेंबरला विशेष महासभा झाली. यात गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा मनसेने उपस्थित करत महिला-बालकल्याणसाठी आपल्या पक्षाच्या सदस्याचे नाव दिले नाही. त्यामुळे महापौर राजेंद्र देवळेकरांनी १० जणांच्याच नावाची घोषणा केली. एका सदस्याची नियुक्ती न झाल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीला अडचण उद्भवणार नाही, असे पीठासीन अधिकारी देवळेकर यांनी स्पष्ट केले होते. (प्रतिनिधी)