पालिका कर्मचा-यांना निवडणुकीचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:15 AM2017-08-02T02:15:54+5:302017-08-02T02:15:54+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मॅक्सस मॉल व एलबीटी मध्यवर्ती कार्यालयात कर्मचाºयांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाला शुक्रवारी सुरूवात झाली.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मॅक्सस मॉल व एलबीटी मध्यवर्ती कार्यालयात कर्मचाºयांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाला शुक्रवारी सुरूवात झाली. त्यातील इव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण कर्मचाºयांसह मुख्य निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनीही घेतले.
पालिकेने निवडणुकीसाठी ४ हजार ७५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्याखेरीज ९७ विभागीय अधिकारी, २० सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, ९ निवडणूक निर्णय अधिकारी व ८ मतदान केंद्रांवर नियंत्रण ठेवणाºया अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.
७७४ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. मतदान यंत्रातील बिघाडापासून त्यातील मतदानाच्या अचूक नोंदी तपासण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मतदानासाठी सुमारे २०० मशीन तयार ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प्रशिक्षणानंतर कर्मचाºयांना हजर राहिल्याचा पुरावा म्हणून अर्ज भरून जमा करावा लागत होता. सकाळच्या सत्रानंतर अर्ज भरण्यासाठी कर्मचाºयांची झुंबड उडाली होती.