ठाणे जिल्ह्यातील ग्रा.पं.च्या बुधवारी निवडणुका; तीन सरपंचांसाठी उमेदवारी अर्ज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 05:54 PM2018-09-24T17:54:32+5:302018-09-24T17:58:16+5:30

भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्राम पंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आलेत. उर्वरित सदस्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी

Elections to the Grampanchayat in Thane district on Wednesday; There are no nomination forms for three Sarpanchs | ठाणे जिल्ह्यातील ग्रा.पं.च्या बुधवारी निवडणुका; तीन सरपंचांसाठी उमेदवारी अर्ज नाही

जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्राम पंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आलेत.

Next
ठळक मुद्देभिवंडी तालुक्यातील एका ग्राम पंचायतीच्या १४ सदस्यांसाठीमुरबाड तालुक्यातहीदोन ग्राम पंचायतींच्या निवडणुकाभिवंडी तालुक्यातील एका ग्राम पंचायती

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्राम पंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आलेत. उर्वरित सदस्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी निवडणुका आहेत. यातील तीन ग्राम पंचायतींच्या सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच प्राप्त झाले नाही. यामुळे संबंधीत ग्राम पंचायत सरपंच पदासाठी यावेळी मतदान होणार नाही.
भिवंडी तालुक्यातील एका ग्राम पंचायतीच्या १४ सदस्यांसाठी निवडणूक आहे. यातील दोन जागांसाठी नामनिर्देशनपत्र आले नाहीत. तर ११ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित केवळ एका जागेसाठी भिवंडीतील ग्राम पंचायतीमध्ये मतदान होईल. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातहीदोन ग्राम पंचायतींच्या निवडणुका हाती घेतल्या आहेत. यातील १६ सदस्यांपैक्ी एका जागेसाठी उमेदवारी प्राप्त झाली नाही. तर उर्वरित नऊ जागा बिनविरोध निवडून आल्या. प्रत्यक्षात आता केवळ सहा जागांसाठी मतदान होईल.
याशिवाय शहापूर तालुक्यातील चार ग्राम पंचायतींची निवडणूक हाती घेतली आहे. यातील एक ग्राम पंचायत पूर्णपणे बिनविरोध निवडून आली आहे. उर्वरित तीन ग्राम पंचायतींच्या ४२ सदस्यांपैकी दहा सदस्य बिनविरोध निवडून आलेत. तर उर्वरित शिल्लक ३२ जागांसाठी आता मतदान होईल. सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणुका शहापूर आणि भिवंडी तालुक्यात आहेत. यातील भिवंडीच्या एका सरपंचासाठी उमेदवारी अर्जच आलेला नाही. शहापूरच्या तीन सरपंच पदांपैकी दोन ठिकाणी उमेदवार मिळाले नाही. यामुळे येथे सरपंच पदासाठी निवडूक होणार नाही. उर्वरित सरपंचाच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे.

Web Title: Elections to the Grampanchayat in Thane district on Wednesday; There are no nomination forms for three Sarpanchs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.