स्थायीसाठी सेना-भाजपात चुरस, १६ मे रोजी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:45 AM2018-05-12T01:45:52+5:302018-05-12T01:45:52+5:30

वादात अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या १६ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता शुक्रवारी शिवसेनेकडून राम

Elections on May 16 in Army-BJP elections | स्थायीसाठी सेना-भाजपात चुरस, १६ मे रोजी निवडणूक

स्थायीसाठी सेना-भाजपात चुरस, १६ मे रोजी निवडणूक

Next

ठाणे : वादात अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या १६ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता शुक्रवारी शिवसेनेकडून राम रेपाळे आणि भाजपाकडून नारायण पवार यांनी अर्ज भरले आहे. तर, दुसरीकडे राष्टÑवादी कॉँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यातच, यावेळी पाच विशेष समित्यांच्या सभापतीपदांसाठी फक्त शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्या समित्यांवर शिवसेनेचा वरचष्मा राहून त्या बिनविरोध होणार आहेत.
मागील वर्षी शिवसेनेने काँग्रेसला हाताशी धरून स्थायी समितीची गणिते आखली होती. त्यानुसार, काँग्रेसचा एक सदस्य हा त्यांनी स्थायी स्ािमतीत घेतला होता. परंतु, पक्षाला विश्वासात न घेता, काँग्रेसचे यासीन कुरेशी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने इतर दोन नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त करून थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्र ार केली होती. अखेर, काँग्रेसने पाठिंबा देण्यास नकार दिला. परंतु, स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असताना मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पीठासीन अधिकाºयांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे मागील दीड वर्षापासून स्थायी समिती गठीत होऊच शकली नाही. त्यात आता नव्या आर्थिक वर्षात शिवसेनेने स्थायी समिती गठीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. दुसरीकडे ही निवडणूक योग्य पद्धतीने असेल, तर आम्ही सहकार्य करू. परंतु, नियमबाह्य असेल, तर कायदेशीर मार्गाने याबाबत दाद मागू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची मानली जाणार आहे.कॉँग्रेसचे सदस्य गैरहजर जरी राहिले, तरी शिवसेनेच्या बाजूने झुकते माप असणार आहे.
सध्या शिवसेनेचे स्थायी समितीमध्ये आठ, क ाँग्रेसचा एक, राष्ट्रवादीचे चार आणि भाजपाचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे काँंग्रेसच्या एका सदस्याने राष्ट्रवादीला टाळी दिली आणि राष्ट्रवादीने भाजपाला हाताशी घेतल्यास, तर शिवसेना ८ आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपा मिळून ८ सदस्य होणार आहेत. त्यातच, काँग्रेसचा एकमेव सदस्य असलेल्या यासीन कुरेशी यांनी जर शिवसेनेच्या बाजूने मतदान केले, तर राष्ट्रवादी, भाजपा एकत्र येऊनही सभापतीपदाची माळ सेनेच्या गळ्यात पडणार आहे.

तब्बल दीड वर्षाने ठाणे ठामपा स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होत आहे. सभापतीपदासाठी शिवसेनेकडून राम रेपाळे आणि भाजपाकडून नारायण पवार यांनी शुक्र वारी महापालिका सचिव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी शिवसेनेच्या राधिका फाटक यांनी शिक्षण समितीसाठी विकास रेपाळे, क्र ीडा समाजकल्याण सांस्कृतिक कार्यक्र म समितीसाठी दीपक वेतकर, आरोग्य समितीसाठी नम्रता घरत, गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीसाठी पूजा करसुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पाचही ठिकाणी केवळ शिवसेनेच्या उमेदवारांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे

Web Title: Elections on May 16 in Army-BJP elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.