ठाणे जिल्ह्यात वीज मीटर रीडिंगच्या कंत्राटांची खिरापत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:41 AM2018-07-10T05:41:46+5:302018-07-10T05:42:00+5:30

वीज मीटर रीडिंगसाठी कमी दराची निविदा भरलेल्या ठेकेदाराला नियमाप्रमाणे काम देणे अपेक्षित असताना एकच काम निविदा भरलेल्या पाच ते सहा ठेकेदारांना दिल्याचा प्रकार ‘महावितरण’च्या वाशी डिव्हीजनमध्ये घडल्याची बाब उघड झाली आहे.

 Electricity meter readings scandal in Thane district! | ठाणे जिल्ह्यात वीज मीटर रीडिंगच्या कंत्राटांची खिरापत!

ठाणे जिल्ह्यात वीज मीटर रीडिंगच्या कंत्राटांची खिरापत!

googlenewsNext

ठाणे  - वीज मीटर रीडिंगसाठी कमी दराची निविदा भरलेल्या ठेकेदाराला नियमाप्रमाणे काम देणे अपेक्षित असताना एकच काम निविदा भरलेल्या पाच ते सहा ठेकेदारांना दिल्याचा प्रकार ‘महावितरण’च्या वाशी डिव्हीजनमध्ये घडल्याची बाब उघड झाली आहे. त्याबाबत महावितरणाच्या मुंबईतील मुख्य चौकशी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल झाली आहे.
दुसरीकडे आपल्या जवळच्या आणि मर्जीतील ठेकेदारांना काम मिळावे म्हणून एका कंत्राटदाराची निविदा कोणतेही कारण न देता ठाणे-२ सबडिव्हिजनमध्ये डावलल्याची तक्रार भांडुप नागरी परिमंडळातही दाखल झाली आहे. निविदा मंजूर करताना महावितरणच्याच काही अधिकाºयांनी ही क्लृप्ती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
महावितरणच्या माध्यमातून मीटर फोटो रीडिंग, बिल प्रिटिंग आदींसह पाच कामांची मिळून वाशी, कोपरखैरणे, ऐरोली या भागांची १ कोटींची निविदा काढली होती.
ई टेंडरिंगद्वारे ही निविदा प्रक्रिया
पार पडली होती. त्यामुळे
नियमानुसार कमी दराची निविदा भरलेल्या कंत्राटदाराला काम देणे अपेक्षित होते.
परंतु या नियमाला हरताळ फासण्याचा प्रकार काही अधिकाºयांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ज्या ठेकेदाराला ऐरोलीचे काम दिले गेले त्याला ते काम संपूर्ण न देता, विभागून देण्यात आले. तर वाशीचे कामही त्यानेच करावे, असा हट्ट केला गेला.
वास्तविक त्याने ज्या ठिकाणी कामाचे टेंडर भरले असेल त्या ठिकाणचेच काम तो करू शकतो, परंतु टक्केवारीच्या हव्यासापोटी हा अट्टाहास केला गेला.
एका ठेकेदाराला काम देण्यापेक्षा तेच काम निविदा भरलेल्या चार ते पाच जणांत विभागून दिले तर प्रत्येकाकडून टक्केवारीचा लाभ होऊ शकतो, असा महावितरणच्या काही भ्रष्ट अधिकाºयांचा प्रयास असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तीन महिन्यांनी वर्क आॅर्डर
उपरोक्त कामाची निविदा प्रक्रिया एप्रिलमध्ये पूर्ण झाल्यानंतर तत्काळ वर्कआॅर्डर देणे अपेक्षित होते. परंतु तीन महिन्यांनंतर वर्कआॅर्डंर देण्यात आली.

कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरही निविदा बाद
ठाणे २ या सबडिव्हिजनमध्ये वीज मीटर रीडिंग कामाची निविदा काढण्यात आली होती. आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे या उद्देशाने ज्या ठेकेदाराने कागदपत्रांची पूर्तता केली होती आणि ज्याने सर्वात कमी दराची निविदा भरली होती, त्यालाच कागदपत्रांची योग्य वेळेत पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत बाद करण्यात आले.
चौकशी करून दोषींवर कारवाई करू
निविदांमधील घोटाळ््याबाबत तक्रारीचे पत्र आले आहे का, याची प्रथम तपासणी केली जाईल. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यानुसार पुढील पावले उचलली जातील.
- पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंत्या, भांडुप नागरी परिमंडळ

Web Title:  Electricity meter readings scandal in Thane district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.