भिवंडीत विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संरक्षण जागरूकता शिबीर संपन्न
By नितीन पंडित | Published: February 15, 2024 05:11 PM2024-02-15T17:11:14+5:302024-02-15T17:14:08+5:30
टोरेंट पॉवरने आयोजित केलेल्या या जनजागृती कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांसह असंख्य विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
नितीन पंडित, भिवंडी : विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षा व ऊर्जा संरक्षण या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी भिवंडीतवीज वितरण करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीने शहरातील अमजदिया उर्दू प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन या विषयावर जनजागृती केली. टोरेंट पॉवरने आयोजित केलेल्या या जनजागृती कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांसह असंख्य विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षा व ऊर्जा संवर्धन या विषयावर टोरंट पावरच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत विद्युत सुरक्षेबाबत माहिती व्हावी यासाठी शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
मुलांमध्ये विद्यार्थी दशेतच विद्युत सुरक्षा बाबत माहिती व मार्गदर्शन करणे आवश्यक असून लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विद्युत बचतीचे महत्व देखील समजायला हवे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत करण्यात आले असून अशाच प्रकारचे कार्यक्रम मागील महिन्यांत स्कॉलर्स इंग्लिश मीडियम स्कूल, आदर्श विद्यालय - कुरुंद आणि एनईएस इंग्लिश मीडियम स्कूल, ब्राह्मण अली येथेही आयोजित करण्यात आली होती. भिवंडी, शिळ, मुंब्रा आणि कळवा येथील विविध शाळांमध्ये अशी सत्रे सुरू ठेवणार असल्याची माहिती टोरंट पॉवरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी गुरुवारी दिली आहे.