वाशीच्या काही परिसराचा वीज पुरवठा बंद
By admin | Published: January 5, 2017 01:37 PM2017-01-05T13:37:34+5:302017-01-05T13:37:34+5:30
महावितरण कंपनीच्या वाशी विभागातील वीज वाहिनीचे देखभाल, दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे वाशी विभागाच्या काही परिसराचा वीजपुरवठा बंद राहील.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई - महावितरण कंपनीच्या वाशी विभागातील वीज वाहिनीचे देखभाल, दुरूस्तीचे काम शुक्रवार, दि. ०६ जानेवारी, २०१७ रोजी हाती घेण्यात येणार असल्यामुळे वाशी विभागाच्या काही परिसराचा वीजपुरवठा बंद राहील.
२२ के.व्ही. नोसील लिंक लाईन या वीज वाहिनीवरील वृषाली हॉटेल ते दशमेरा आणि दशमेरा ते अल्ट्राटेक सिमेंट, भूषण हॉटेल, एमआयडीसी रबाळे आदी परिसराचा वीजपूरवठा तसेच २२ के.व्ही. फिलिप्स् या वीज वाहिनीवरील एचटी ग्राहक - भारत बिजली, हिंदुस्तान लिव्हंर, दिवा नाका, शिवाजी फ्लोर मिल आणि मेरीडियन फ्लोर मिल, इंडिगो, पोलीस स्टेशनच्या मागील परिसर, महाजन हॉस्पिटल आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत बंद राहील.
तर २२ के.व्ही. सावळा कोल्ड् स्टोरेज या वीज वाहिनीवरील सानपाडा परिसर, एम जी नगर, अलाना ग्रप आणि कुकशेत परिसर आदी भागाचा वीजपूरवठा सकाळी ०९.०० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत बंद राहील. तरी ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.