वीज कर्मचारी बेमुदत राज्यस्तरीय संपाच्या तयारीत
By सुरेश लोखंडे | Published: March 1, 2024 05:35 PM2024-03-01T17:35:06+5:302024-03-01T17:35:42+5:30
राज्य सरकारने व विज कंपन्यांच्या व्यवस्थापनाने लक्ष घालून कंत्राटी कामगारांच्या संघटना बरोबर चर्चा करून मार्ग काढावा असे आव्हान महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते,अधिकारी कृती समितीने राज्याचे उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले.
ठाणे : राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने कंत्राटी वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अलिकडेच दाेन दिवसांचा संप करून प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यानंतरही राज्यभरातील तब्बल ४२ हजार कर्मचाऱ्यांच्या हिताचा अध्यादेश आगामी पाच दिवसात जारी न केल्यास ५ मार्चपासून वीज कर्मचारी बेमुदत राज्यव्यापी संप करून प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे, असे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी लाेकमतला सांगितले.
राज्य सरकारने व विज कंपन्यांच्या व्यवस्थापनाने लक्ष घालून कंत्राटी कामगारांच्या संघटना बरोबर चर्चा करून मार्ग काढावा असे आव्हान महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते,अधिकारी कृती समितीने राज्याचे उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले. अन्यथा वीज कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यास वीज निर्मिती,पारेषण व वितरणावर माेठा परिणाम हाेऊन जनमाणसाला, उद्याेगधंद्यांना त्याचा फटका बसणार असल्याचेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. या काळात अवकाळी पावसासह काही नैसर्गिक समस्या उद्भवल्यास वीज पुरवठ्यावर परिणामाचा धोका संभवण्याचा इशाराही या वीज कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे.