संजय गांधी उद्यानात इलेक्ट्रॉनिक बग्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:26 AM2018-10-02T05:26:02+5:302018-10-02T05:26:19+5:30
नॅशनल पार्कात नुकताच आरंभ कार्यक्रम पार पडला. या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अॅम्बेसिडर रविना टंडन यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता इलेक्ट्रॉनिक बग्गी धावणार आहे. ई-बग्गी एकदा फुल चार्ज केल्यावर ९० किलोमीटर अंतर धावेल. त्यामुळे वन संरक्षित विभागामध्ये प्रदूषणाला आळा बसेल. ई-बग्गीला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील काळात इलेक्ट्रॉनिक कार व बग्गीची संख्या वाढविली जाणार आहे.
नॅशनल पार्कात नुकताच आरंभ कार्यक्रम पार पडला. या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अॅम्बेसिडर रविना टंडन यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक बग्गीचा ‘श्रीगणेशा’ करण्यात आला. ही इलेक्ट्रॉनिक बग्गी एका खासगी कंपनीने नॅशनल पार्कला भेट स्वरूपात दिली आहे. ई-बग्गी पूर्णपणे बॅटरीवर चालणारे वाहन आहे. या वाहनाला एकदा फुल चार्ज केल्यावर ९० किलोमीटरपर्यंत धावू शकते. ई-बग्गीचा ताशी वेग ४० किलोमीटर इतका आहे. ई-बग्गीमध्ये चार प्रवासी बसू शकतील, अशी आसन व्यवस्था आहे. नॅशनल पार्कातील विविध पॉइंटवर पर्यटकांना नेण्यासाठी या ई-बग्गीचा वापर करण्यात येईल, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक संजय कांबळे यांनी दिली. रिव्हर मार्चचे कार्यकर्ता गोपाळ झवेरी याबाबत म्हणाले, इलेक्ट्रॉनिक वाहनांबाबतचार महिन्यांपासून वनविभागाकडे मागणी करीत आहोत, परंतु इंधनावर चालणाऱ्या गाड्या पार्क करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी एक पार्किंगची व्यवस्था पर्यटकांना करून द्यावी, अशी मागणी वनविभागाला केली होती. मात्र, आता रिव्हर मार्चच्या मागणीनुसार काम सुरू झाले आहे.