दर १५ मिनिटांनी होतो एका हत्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:24 AM2019-09-21T01:24:09+5:302019-09-21T01:24:13+5:30

दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होतो. हे असेच सुरू राहिले तर, याचा फटका आधी आफ्रिकन आणि नंतर आशियाई हत्तींना बसेल.

An elephant dies every 6 minutes | दर १५ मिनिटांनी होतो एका हत्तीचा मृत्यू

दर १५ मिनिटांनी होतो एका हत्तीचा मृत्यू

googlenewsNext

ठाणे : दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होतो. हे असेच सुरू राहिले तर, याचा फटका आधी आफ्रिकन आणि नंतर आशियाई हत्तींना बसेल. २०२५ नंतर भूतलावर हत्तीच नसतील, अशी नोंद अभ्यासकांनी केली आहे. हत्ती नसेल तर निसर्गचक्र कोलमडेल आणि हा निसर्ग उभा करण्याची ताकद माणसात नाही, अशी भीती हत्तीचे अभ्यासक आनंद शिंदे यांनी व्यक्त केली.
अत्रे कट्ट्यावर बुधवारी शिंदे यांचा एक संवाद हत्तींशी या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते म्हणाले, निसर्गात हत्तीला अभियंता किंवा वास्तुविशारद म्हणतात. निसर्गचक्रातले बरेचसे प्राणी, पक्षी, फळे त्यांच्यावर अवलंबून असतात. हत्ती दिवसाला १५० किलो अन्न आणि २०० ते २५० लीटर पाणी पितो. हत्तीने एकावेळी टाकलेल्या शेणावर हजारो किडे जगतात. हत्ती जंगलात फिरताना फळे, पाने खातो आणि त्या फळांचे बी शेणाद्वारे बाहेर पडते. ते शेण खायला शेणकिडे येतात. त्या शेणाचे छोटेछोटे गोळे करून ते बिळात साठवून ठेवतात. काही वेळा ते बी तिथेच राहते. मग त्या बी ला खतपाणी मिळून झाड तयार होते. काही झाडांच्या बिया अशा असतात की, त्यांना हत्तीच्या पचनसंस्थेतून गेल्याशिवाय पुन्हा जन्म घेताच येत नाही. हत्ती नदीवर जातो, तेव्हा त्याचे पाऊल उमटते. तो नदीत बसला की, त्या नदीतील पाणी त्या पावलात साचते. त्या पावलातील पाण्यात किडे येतात. त्या किड्यांना खायला बेडूक, बेडकाला खायला साप, सापाला खायला गरुड आणि अशा प्रकारे अन्नसाखळी तयार होते. हत्तीच्या पावलात साठलेल्या पाण्यात मधमाश्या, फुलपाखरेदेखील येतात. हत्ती जंगलातून जाताना त्याचे सूळ झाडाला घासले गेले की, त्या जागेत पाली व सरडे राहून स्वत:चा शत्रूपासून बचाव करतात. हत्तींची संख्या वाघासारखी प्रचंड वाढत नाही. हत्ती मरतो एका सेकंदात, पण तो जन्माला यायला २२ महिने लागतात. भारतात हत्तींची संख्या कमी होत आहे. भारतात हत्तींची शेवटची गणना २०१२ साली झाली होती. पुढची गणना लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: An elephant dies every 6 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.