दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे : आनंद शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 05:23 PM2019-09-19T17:23:33+5:302019-09-19T17:28:03+5:30

केरळला गेल्यावर हत्तीची देहबोली, त्यांची वागण्याच्या पद्धती, त्यांच्यात होणारा संवाद कळाला असे आनंद शिंदे यांनी सांगितले.

Elephants are dying every 5 minutes in the world: Anand Shinde | दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे : आनंद शिंदे

दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे : आनंद शिंदे

googlenewsNext
ठळक मुद्देदर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे : आनंद शिंदे २०२५ नंतर या भूतलावर हत्तीच नसेल अशी नोंद अभ्यासकांनी केली आहेएक संवाद हत्तींशी या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे: दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे आणि हे असेच सुरू राहिले तर याचा फटका पहिला अफ्रिकन हत्तींना आणि नंतर आशियाई हत्तींना बसेल. २०२५ नंतर या भूतलावर हत्तीच नसेल अशी नोंद अभ्यासकांनी केली आहे. हत्ती नसेल तर निसर्गचक्र कोलमडेल आणि हा निसर्ग उभा करण्याची ताकद माणसात नाही अशी भिती हत्तीचे अभ्यासक आनंद शिंदे यांनी व्यक्त केली.
          अत्रे कट्ट्यावर बुधवारी शिंदे यांचा एक संवाद हत्तींशी या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते म्हणाले, निसर्गात हत्तीला अभियंता किंवा वास्तुविशारद म्हणतात. निसर्गचक्रातले बरेचशे प्राणी, पक्षी, फळे त्याच्यावर अवलंबून असतात. हत्ती दिवसाला १५० किलो अन्न आणि २०० ते २५० लिटर पाणी पितो. हत्तीने एकावेळी टाकलेल्या शेणावर हजारो किडे जगतात. हत्ती जंगलात फिरताना फळे, पाने खातो आणि त्या फळांचे बी शेणाद्वारे बाहेर पडते. ते शेण खायला शेण किडे येतात, त्या शेणाचे छोटे छोटे गोळे करुन ते बिळात साठवून ठेवतात. काही वेळा ते बी तिथेच राहते मग त्या बीला खतपाणी मिळून त्याचे झाड तयार होते. काही झाडांच्या बिया असा असताता त्यांना हत्तीच्या पचनसंस्थेतून गेल्याशिवाय पुन्हा जन्म घेताच येत नाही. हत्ती नदीवर जातो तेव्हा त्याचे पाऊल उमटते. तो नदीत बसला की त्या नदीतील पाणी त्या पावलात साचते. त्या पावलातील पाण्यात किडे येतात, त्या किड्यांना खायला बेडूक, बेडकाला खायला साप, सापाला खायला गरुड आणि अशा प्रकारे अन्नसाखळी तयार होते. हत्तीच्या पावलात साठलेल्या पाण्यात मधमाशा, फुलपाखरु देखील येतात. हत्ती जंगलातून जाताना त्याचे सुळ झआडाला घासले गेले की त्या जागेत पाली व सरडे त्यात राहून स्वत-चा शत्रुपासून बचाव करतात. यावेळी त्यांनी हेरे गावात हत्तीविषयी केलेल्या जनजागृतीची घटना सांगितली. हत्ती नाहीसा झआला तर निसर्गचक्र कोलमडून पडेल हत्तीची संख्या वाघासारखी प्रचंड वाढत नाही. हत्ती मरतो एका सेकंदात पण तो जन्माला यायला २२ महिने लागतात असेही त्यांनी सांगितले. सुरूवातीला शिंदे यांनी या विषयाकडे कसे वळले हा प्रवास त्यांनी उलगडला.

Web Title: Elephants are dying every 5 minutes in the world: Anand Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.