अकरा जि.प. शाळा धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:13 PM2018-10-28T23:13:22+5:302018-10-28T23:13:42+5:30
काहींची स्थिती धोकादायक; सर्वशिक्षा अभियानातून विक्रमगड तालुक्यात केलेला खर्च वाया
विक्रमगड : जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत असतांना आता शाळाची इमारती ही धोकादायक बनल्या आहेत. तालुक्यातील जि. प.च्या एकूण २३७ शाळा पैकी ११ शाळा तातडीने दुरुस्ती होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या एक-दोन वर्षा पासून प्रस्ताव पाठवूनही शाळांची डागडूजी न झाल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा उंचावण्या बरोबरच शाळांच्या इमारती बांधण्यात आल्या होत्या. सुरवातीच्या काळात षटकोनी त्यानंतर चौकोनी शाळांच्या इमारती किवा खोल्या बांधण्यात आल्या. परंतु त्या पैकी बऱ्याचशा शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये पावसाळ्यात गळती सुरु झाली. या गळतीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यावर उपाय म्हणून काही शाळांच्या दुरु स्तीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविले गेले मात्र, तांत्रिक कारणे किवा शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे ते काम रखडले आहे. शाळा दुरुस्तीसाठी तालुक्यातून ११ पेक्षा जास्त दुरु स्ती प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. यातील बहुतांश तांत्रिक कारणे किवा निधी अभावी रखडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या शाळाच्या इमारती लवकरात लवकर दुरु स्ती करण्यात याव्यात अशी मागणी आहे.
बैठक व्यवस्थेच्या नूतनीकरणाची गरज
विक्र मगड तालुक्यात एकूण २३७ जिल्हा परीषदेच्या शाळा आहेत. त्यातील विद्यार्थी संख्या घटत असली तरी पटसंख्येवरील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी जिल्हा परीषदेची आहे. बहुतांशी लाकडी आणि आणि सीमेंट कॉंक्रीटचे छप्पर असलेल्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी वर्गखोल्यामधील बैठक व्यवस्थेच्या नूतनीकरणाची गरज आहे. तर काही खोल्यांच्या दरवाजे-खिडक्याच्या झडपा बदलण्याची गरज आहे.
धोकादायक इमारती पुढील प्रमाणे : धोकादायक व नादुरुस्त असल्याने खडकी, मेढी, धामणी, क्रु झे, दादडे , इंदगाव, उपराळे, जांभे, आपटी बु., ठाकुरपाडा (शेवते), पोचाडे या शाळांच्या इमारतींची तातडीने दुरु स्ती करणे किंवा काही इमारती पाडणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होते आहे.
धोकादायक शाळेच्या दुरुस्तीचे प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदे कडे पाठवले असून ते मंजूर झाले की, आम्ही या सर्व इमारती दुरु स्त करु न घेऊ. काही धोकादायक इमारती पाडण्याची मान्यता मिळाली की, त्या पाडण्यात येतील. त्या ठिकाणी नवीन बांधण्यात येतील.
- भगवान मोकाशी, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती विक्र मगड