अकरावी आॅनलाइनचा घोळ

By admin | Published: June 18, 2017 02:18 AM2017-06-18T02:18:40+5:302017-06-18T02:18:40+5:30

दहावीचा निकाल घोषीत होताच ११ वीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली आहे. सुमारे पाच दिवस दिवस उलटलेले असतानाही या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ शिक्षण विभागास

The eleventh online rumble | अकरावी आॅनलाइनचा घोळ

अकरावी आॅनलाइनचा घोळ

Next

- सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दहावीचा निकाल घोषीत होताच ११ वीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली आहे. सुमारे पाच दिवस दिवस उलटलेले असतानाही या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ शिक्षण विभागास संपवता आला नाही. या प्रक्रियेतील फार्म क्र. २ ची आॅनलाईन माहिती सबमिट करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसांपासून शाळेत बोलवण्यात येत आहे. परंतु,तांत्रिक समस्येमुळे वेबसाईट ओपन होत नसल्याने प्रवेश अर्ज सबमिट करता आले नाहीत. काही शाळांनी सोमवारऐवजी मंगळवारी पालकांना अर्ज दाखल करण्यासाठी बोलावलेले आहे. या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून पालकवर्गांत संताप व्यक्त होत आहे.
गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना ११ वीला आॅनलाईन प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २६१ महाविद्यालये सज्ज झाली आहेत. त्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या जिल्ह्यात ९५ हजार ३६० जागी या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. परंतु, तांत्रिक समस्येमुळ वेबसाईट बंद आहे. यामुळे गुणवत्तेनुसार आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात कोठेही सुरू झालेली नाही. रविवार व सोमवार वगळता शाळांनी पालकांना मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी यायला सांगितले आहे. परंतु, ठिकठिकाणच्या शाळांमधील अल्पसंख्यांक कोट्यासह व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहे. गुणवत्तेनुसार एकही आॅनलाईन प्रवेश सुमारे पाच दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात झालेला नसल्याचे आढळून आले आहे.
आॅनलाईन फार्म भरतेवेळी विद्यार्थ्यांकडून चुका होत असल्यामुळे यंदा प्रत्येक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत आहे. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे वेबसाईट सुरू नसल्यामुळे प्रवेश अर्ज सबमिट करता येत नाहीत. या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्यांक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश वगळण्यात आले आहेत.
यामुळे उल्हासनगर, भिवंडी आदींसह जिल्ह्यातील ठिकाणचे अल्पसंख्यांक कॉलेजेस त्यांच्या ५० टक्के आरक्षणाच्या जागांसाठी आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीस्कारत आहेत. याशिवाय व्यवस्थापन कोट्यातील ५ टक्के आरक्षित जागांसाठीदेखील प्रवेश अर्ज ठिकठिकाणी स्वीकारले जात आहेत. यासाठी बहुतांशी ठिकाणी विद्यार्थ्यांकडून कमीतकमी १०० रूपये शुल्क घेतले जात आहे.

- गुणवत्तेच्या आॅनलाईन प्रवेशासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीदेखील वेबसाईटवर फार्म क्र. २ अपलोड झाला नाही. दुपारपर्यंत प्रयत्न करूनही वेबसाईट सुरळीत झाली नाही. यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर संबंधीत शाळांनी विद्यार्थी व पालकांना घरी जाण्यास सांगितले. त्यानंतरही वेबसाईट सुरू न झाल्यामुळे शाळांना आजही आॅनलाईन प्रवेश अर्ज सबमिट करता आले नाहीत. निकाल घोषीत होऊन पाच दिवस उलटलेले असतानाही जिल्ह्यातील एक लाख तीन हजार ६०३ विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया अद्यापही यशस्वीपणे पूर्ण करता आलेली नाही.

Web Title: The eleventh online rumble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.