उल्हासनगरात रविवारी कलावंताची एल्गार परिषद; राज्य शासनाची ५६ हजार कलावंताची गणना कोणत्या आधारे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:54 PM2021-08-13T16:54:38+5:302021-08-13T16:55:14+5:30

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतासाठी कोरोना काळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी ५००० रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली.

Elgar Conference of Artists on Sunday in Ulhasnagar; Request to publish a list of when the calculation was made | उल्हासनगरात रविवारी कलावंताची एल्गार परिषद; राज्य शासनाची ५६ हजार कलावंताची गणना कोणत्या आधारे?

उल्हासनगरात रविवारी कलावंताची एल्गार परिषद; राज्य शासनाची ५६ हजार कलावंताची गणना कोणत्या आधारे?

Next

- सदानंद नाईक

उल्हासनगर : कोरोना काळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतासाठी प्रत्येकी ५ हजार रूपये मंजूर केल्या बद्दल गायिका निशा भगत यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. मात्र ५६ हजार कलावंताची गणना कधी केली? असा प्रश्न उपस्थित करून यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली. तसेच कलावंताची रविवारी एल्गार परिषद आयोजित केल्याची माहिती दिली. 

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतासाठी कोरोना काळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी ५००० रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली. याबाबत त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. दरम्यान कलावंतांना देण्यात आलेल्या मानधनावरून सोशल मीडियावर श्रेयवाद रंगला असतांना, शासनाने ५६ हजार कलावंतांची गणना कोणत्या आधारे केली?, त्यांच्यात सर्व कलावंताचे नाव आहे का?, ज्यांनी यादी बनविली, त्यांना कलावंतांची नावे माहीत आहेत का?, असेलतर कलावंतांच्या नावाची यादी राज्य शासनाने प्रसिद्ध करावी. आदी अनेक प्रश्न कलावंताना पडले. त्यांच्या भावनाना वाट करून देण्यासाठी गायिका निशा भगत यांनी उल्हासनगर कॅम्प नं-४ येथे रविवारी कलावंतांच्या एल्गार परिषदेचे आयोजन केले. जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील कलावंत एल्गार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

शासनाने या कलावंत यादीमध्ये तमाशा कलावंत, भारुड, गोंधळी, ब्यांड पथक, ऑर्केस्ट्रा कलाकार, चित्रपट मालिका नाट्य रंगभूमी वरील कलावंत, मेकअप, आर्टिस्ट सिने चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व तांत्रिक कर्मचारी, विविध हॉटेल्स मध्ये कला सादर करणारे कलावंत अशा विविध क्षेत्रातून कला सादर करणारे कलावंत आदीचा समावेश यादीत करावा. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका पातळीवर शासनाने सर्वेक्षण करून कलावंताची यादी तयार करावी. अशी मागणी निशा भगत यांनी शासनाकडे केली. महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहे नाट्यगृहे पूर्ववत सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीची वेळेची मर्यादा हटवून परवानगी देण्याची मागणी केली. 

५ हजाराचे मानधन संपल्यावर उपाशी मरायचे काय?

 राज्य शासनाने कोरोना काळात राज्यातील कलावंता साठी ५ हजार रुपये प्रत्येकी मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र ५ हजार रुपये मानधन संपल्यावर कलावंतांनी उपाशी मरायचे काय? असा प्रश्न निशा भगत यांनी शासनाला केला. कोरोना संपेपर्यंत व कलावंतांचे काम सुरू होई पर्यंत दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली.

Web Title: Elgar Conference of Artists on Sunday in Ulhasnagar; Request to publish a list of when the calculation was made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.