लोकल रद्द झाल्याने अत्यावश्यक सेवेतील कामगार त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 07:45 PM2020-08-21T19:45:50+5:302020-08-21T19:46:20+5:30

ऐनवेळी लोकल सेवा रद्द झाल्याने शुक्रवारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घरी परतताना त्रास झाला. त्यात रेल्वेमन साठी सोडण्यात आलेल्या लोकल मध्ये अन्य प्रवाशांना न चढू दिल्याने देखील प्रवासी नाराज झाले.

Emergency service workers suffer due to local cancellation | लोकल रद्द झाल्याने अत्यावश्यक सेवेतील कामगार त्रस्त

लोकल रद्द झाल्याने अत्यावश्यक सेवेतील कामगार त्रस्त

Next

डोंबिवली - ऐनवेळी लोकल सेवा रद्द झाल्याने शुक्रवारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घरी परतताना त्रास झाला. त्यात रेल्वेमन साठी सोडण्यात आलेल्या लोकल मध्ये अन्य प्रवाशांना न चढू दिल्याने देखील प्रवासी नाराज झाले. लोकलच्या कोरोना वेळापत्रकाच्या 25 मिनिटे लेट वेळापत्रक धावल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. अधिच मर्यादित लोकल सेवा असल्याने त्यात लोकल रद्द झाल्याने प्रवाशांची संध्याकाळ विविध ठिकाणच्या रेल्वे स्थानकात वेटिंगवर गेली. त्यात महिला प्रवाशांचा समावेश होता. कल्याण, ठाणे मार्गावर जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे कसारा, कर्जत मार्गावर जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दी झाली होती. फिजिकल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला होता. कोरोनाची भीती त्यात लोकल रद्द केल्याने आणखीन अडचण झाली होती. त्याबद्दल सांगायचे तरी कोणाला, तक्रार आणि दाद कोणाकडे मागायची असा सवाल।करत प्रवाशांनी समाज माध्यमावर गर्दी, गैरसोयीचे व्हिडिओ आणि फोटो टाकून त्रास व्यक्त केला.

Web Title: Emergency service workers suffer due to local cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.