इमर्जन्सी शस्त्रक्रिया १५ दिवसांत करता येऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:39 AM2021-09-13T04:39:19+5:302021-09-13T04:39:19+5:30

ठाणे : कोरोना झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची अत्यंत गरज असेल तर १५ दिवसांतही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाचा फिटनेस ...

Emergency surgery can be done in 15 days | इमर्जन्सी शस्त्रक्रिया १५ दिवसांत करता येऊ शकते

इमर्जन्सी शस्त्रक्रिया १५ दिवसांत करता येऊ शकते

Next

ठाणे : कोरोना झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची अत्यंत गरज असेल तर १५ दिवसांतही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाचा फिटनेस लक्षात घेतला जातो. फिटनेस उत्तम असल्यास एमर्जन्सीमध्ये शस्त्रक्रिया करता येते. यानुसार महिलांचे सिझर शस्त्रक्रिया कोरोना झाल्याच्या कालावधीत कराव्या लागलेल्या आहेत. अन्य शस्त्रक्रिया फिटनेस लक्षात घेऊन एमर्जन्सीमध्ये करता येतात. यासाठी रुग्णाची मानसिकताही तयार करावी लागते.

----

४) प्लान शस्त्रक्रिया -

या प्लान शस्त्रक्रिया नेहमीच्या पद्धतीने करतात. विविध तपासण्यांसह कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ही तपासणी करावी लागते. शस्त्रक्रिया करण्यासाठी भूल द्यावी लागते. यानंतर रुग्णाकडून शस्त्रक्रिया करताना उत्तम प्रतिसाद मिळेल आदी खात्री करून घ्यावी लागते. त्यानंतर प्लान शस्त्रक्रिया केली जाते.

--------

५) डाॅक्टरांची प्रतिक्रिया-

- आपल्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या कलावधीत एमर्जन्सीमध्ये महिलांचे सिझर ऑपरेशन करावे लागले आहे. सिव्हिल कोविड रुग्णालय असल्यामुळे अन्य शस्त्रक्रिया करण्यासाठी आपल्याकडे आलेल्या रुग्णांना कळवा हॉस्पिटलला किंवा मुंबईला जे जे रुग्णालयासह सायनला पाठविण्यात येत आहे. रुग्णाची मानसिकता आणि शस्त्रक्रियेची गरज लक्षात घेऊन रुग्णाच्या नातेवाइकास योग्य सल्ला देऊन निर्णय घेतला जातो.

- डॉ. अशोक कांबळे

निवासी वैद्यकीय अधिकारी

सिव्हील रुग्णालय, ठाणे

Web Title: Emergency surgery can be done in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.