करवाढ न करता उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:33 PM2020-02-26T22:33:17+5:302020-02-26T22:33:22+5:30

नागरिकांना दिलासा; बदलापूर पालिकेचा ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

Emphasis on increasing the source of income without taxation | करवाढ न करता उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर

करवाढ न करता उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर

Next

बदलापूर : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता नागरिकांना दिलासा देतानाच पालिकेने उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर दिला आहे. बुधवारी ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना तीन कोटी २६ लाखांची शिल्लक दाखवली आहे. तसेच शहर सुरक्षेवरही विशेष भर देण्यात आला आहे.

कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचा अर्थसंकल्प पालिकेच्या सभागृहात सादर केला. नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांच्याकडे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी हा अर्थसंकल्प सादर करून त्यावर चर्चा केली. पालिकेच्या सभागृहात या अर्थसंकल्पावर चर्चा रंगली. यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींचाच नव्याने विस्तार करण्यात आला आहे. आगरी भवन आणि ‘सेफ सिटी’ हे दोन मुद्दे वगळले तर जुन्याच प्रकल्पांवर नव्याने खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. ४४१ कोटींच्या या अर्थसंकल्पात ४३८ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात पुन्हा बाळासाहेब ठाकरे स्मारक, क्रीडासंकुल, अपंग पुनर्वसन, प्रशासकीय इमारतीचे आश्वासन देण्यात आले आहे. तर सेफसिटी आणि आगरी भवन यासाठी नव्याने तरतूद केली आहे. यंदा अर्थसंकल्पात प्रशासकीय इमारतीसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौक सुरिक्षत करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करत सेफ सिटीचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले आहे. आगरी समाजाला खूश करण्यासाठी आगरी भवनाचे आश्वासनही या अर्थसंकल्पात देण्यात आले आहे. त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षणासोबत सुरू केलेल्या माध्यमिक शिक्षणासाठीही दीड कोटींची तरतूद केली आहे. बालकल्याण, घनकचरा व्यवस्थापन, पालिकेच्या मालमत्ता सुरक्षित करणे, साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवणे आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरातील रखडलेल्या प्रकल्पांनाही गती देण्यावर या बैठकीत चर्चा झाली.

‘घनकचरा’साठी २० कोटींचा खर्च
क्र ीडा संकुलासाठी पाच कोटी, रात्रनिवारासाठी तीन कोटी, तलाव सुशोभिकरणासाठी पाच कोटी, रस्ते विकासासाठी ३० कोटी, दलितवस्ती सुधारणासाठी पाच कोटी, भुयारी गटार योजनेसाठी १४ कोटी आणि घनकचरा व्यवस्थापनेसाठी २० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर सर्वाधिक भर दिले जाणार आहे.

Web Title: Emphasis on increasing the source of income without taxation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.