भिवंडीतील उड्डाणपूलांवर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवासी हैराण, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
By नितीन पंडित | Published: July 1, 2024 06:46 PM2024-07-01T18:46:47+5:302024-07-01T18:47:17+5:30
भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले असून सुमारे एक फूट खोल तर पाच ते सहा फूट रुंद असे भले मोठे खड्डे पडले आहेत.या भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.
नितीन पंडित
भिवंडी: भिवंडी शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असतानाच वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी बांधण्यात आलेल्या धामणकर नाका उड्डाणपुलासह वंजारपट्टी नाका येथील स्व. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूलावर देखील प्रचंड खड्डे पडले असल्याने नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे उड्डाणपूलांवर पडलेल्या या खड्ड्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले असून सुमारे एक फूट खोल तर पाच ते सहा फूट रुंद असे भले मोठे खड्डे पडले आहेत.या भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.या खड्ड्यांमध्ये अचानक दुचाकी व रिक्षा तसेच इतर वाहने या खड्ड्यांमध्ये आदळल्याने वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. त्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.