वनविभागच्या जागेवर महाराष्ट्र राज्य वीज वितरणचे अतिक्रमण; वनकर्मचाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 02:40 PM2020-08-09T14:40:07+5:302020-08-09T14:40:37+5:30

हे बेकायदेशीर अतिक्रमण स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी विज वितरण कंपनीस अतिक्रमण काढून घेण्याचे पत्र काढले.

Encroachment of Maharashtra State Electricity Distribution on Forest Department premises; Villagers surround forest workers | वनविभागच्या जागेवर महाराष्ट्र राज्य वीज वितरणचे अतिक्रमण; वनकर्मचाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव

वनविभागच्या जागेवर महाराष्ट्र राज्य वीज वितरणचे अतिक्रमण; वनकर्मचाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव

Next

मोखवणे येथील वनविभागाच्या जागेवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून विना परवानगी उभारण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना काल शनिवारी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.यावेळी उपस्थित आमदार दौलत दरोडा,वनपरिक्षेत्र महिला अधिकारी उबाळे पी.एस.गुरचळे, सेना नेते चंद्रकांत जाधव व स्थानिक मंडळींच्या चर्चेतून निघालेल्या ३/२ च्या प्रस्तावाच्या मुद्द्यावर अतिक्रमणित जागेवरील ट्रान्सफार्मर व लोखंडी पोल हटविण्यास तूर्तास तरी स्थगिती देण्यात आली.

वनविभागाच्या परवानगीशिवाय टिचभरही वनजमीन वापरता येत नाही,परंतु विहिगाव(कसारा)वनविभागाच्या वनक्षेत्रातील नियतक्षेत्र मोखावणे सर्व्हे नंबर ३४१ जागेवर वीज वितरण कंपनीने नेमून दिलेल्या कंपनीकडून अनधिकृतरित्या व ट्रान्स्फार्मर व  लोखंडी विद्युत पोल उभे करण्याचे काम अनेक महिन्यापूर्वी  कसारा पश्चिमेकडील टेकडीवर करण्यात आले.हे बेकायदेशीर अतिक्रमण स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी विज वितरण कंपनीस अतिक्रमण काढून घेण्याचे पत्र काढले.

मात्र यावर संबंधित कंपनीकडून कुठलीही कार्यवाही होताना दिसून येत नसल्याचे पाहून वनविभागाने शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पोलिस बंदोबस्तासह आपला फौजफाटा घेऊन अतिक्रमणित घटनास्थळ गाठले.याची कुणकुण लागताच   स्थानिक   महिलांचा मोठा सहभाग असलेल्या नागरिकांनी वनविभाग कर्मचा-यांभोवती गोंधळ घालून विद्युत ट्रान्स्फार्मर  हटविण्यास विरोध केला कारण पूर्णत्वास आलेल्या व   सुरळीत सुरु असलेला   वीज पुरवठा अचानक बंद होणार असल्यामुळे संताप व्यक्त होत

Web Title: Encroachment of Maharashtra State Electricity Distribution on Forest Department premises; Villagers surround forest workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.