भिवंडीतील आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविले; बंगले, फार्महाऊस केले उद्ध्वस्त

By नितीन पंडित | Published: February 26, 2024 05:45 PM2024-02-26T17:45:56+5:302024-02-26T17:46:05+5:30

राहुर गावातील २३ भूमिहीन आदिवासी शेतकरी कुटुंबीयांना १९७८ साली शासनाने शेत जमिनीचे पट्टे नावे करून दिले होते.

Encroachment on tribal land in Bhiwandi removed; Bungalows, farmhouses were destroyed | भिवंडीतील आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविले; बंगले, फार्महाऊस केले उद्ध्वस्त

भिवंडीतील आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविले; बंगले, फार्महाऊस केले उद्ध्वस्त

भिवंडी : तालुक्यातील राहुर गावातील भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले असून याबाबत श्रमजीवी संघटनेने केलेल्या पाठपुराव्या नंतर या जमिनीवरील बनविलेले बंगले ,फार्म हाऊस सोमवारी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली तोडण्यास सुरवात केली आहे.

राहुर गावातील २३ भूमिहीन आदिवासी शेतकरी कुटुंबीयांना १९७८ साली शासनाने शेत जमिनीचे पट्टे नावे करून दिले होते. कालांतराने स्थानिक धनदांडग्यांनी आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या जमिनी नाममात्र पैसे देऊन धाक दाखवून धनिकांनी कब्जा मध्ये घेतल्या होत्या.या जमिनींवर सर्वसुखसोयियुक्त फार्म हाऊस व बंगले, गॉट फार्म बनविण्यात आले होते.चावडी वाचन कार्यक्रमा दरम्यान ही बाब श्रमजीवी संघटनेचे संस्थाक विवेक पंडित यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या जमिनींचा शोध घेतला असता त्यापैकी बहुसंख्य आदिवासी कुटुंबीय जमिनी नसल्याने बेघर झालेले असल्याचे समोर आहे.त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या आदिवासी कुटुंबीयांना त्यांच्या जमिनी परत करीत तसेच सातबारा दप्तरी नोंद केल्याचे दाखले देण्यात आले .त्यानंतर तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासन,पोलिस वनविभाग यांच्या मदतीने या अतिक्रमण केलेल्या जमिनीवरील सर्व बांधकाम जमीनदोस्त केले आहे.

भूमिहीन आदिवासी समाजाला शासनाने दिलेल्या जमिनी परस्पर बळकावणाऱ्यांची माहिती चावडी वाचन कार्यक्रमा दरम्यान लक्षात आल्यानंतर जमिनीवरील अतिक्रमण लक्षात आले.त्याप्रकरणी शासन प्रशासन यांनी सर्व कागदपत्रे तपासून हे अतिक्रमण आज काढून टाकण्यास सुरवात केली आहे.या कारवाईमुळे या पुढे आदिवासी कुटुंबियांच्या जमिनी हडप करणाऱ्यांमध्ये  खळबळ उडाली असून २३ कुटुंबीयांना त्यांच्या जमिनी आज परत मिळणार आहेत.ही ऐतिहासिक कारवाई म्हणून ओळखली जाईल व यापुढे वनपट्टे धारकांच्या जमिनीवरील अतिक्रमण ही अशाच पद्धतीने उद्ध्वस्त केले जाईल त्यासाठी श्रमजीवी पाठपुरावा करणार अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली आहे.

Web Title: Encroachment on tribal land in Bhiwandi removed; Bungalows, farmhouses were destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.